आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा २८ मे रोजी पंढरपुरात

आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा २८ मे रोजी पंढरपुरात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_’आप’ची ‘महाराष्ट्र मोहीम जोमात सुरू_

नागपूर: गुजरात निवडणूकीनंतर राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले असून पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा – 28 मे रोजी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेऊन 6 जून राज्याभिषेक दिनी रायगड येथे यात्रेची सांगता होईल. अशी माहिती दिली. यावेळी पत्रपरिषदेमध्ये भूषण ढाकुलकर, शंकर इंगोले, आणि जगजीत सिंग यांची उपस्थिती होती.

यात्रेची सुरुवात 28 मे रोजी पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने होऊन 6 जून राज्याभिषेक दिनी रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे. स्वराज्य यात्रा सात जिल्ह्यातून जाणार असून या जिल्ह्यातील शहरे व गावांमध्ये सभा होणार आहेत. 782 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करेल.

पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व प्रदेश सह प्रभारी युवा नेते गोपाल इटालिया ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला गुजरातमध्ये 13 टक्के मतदान मिळवत आप ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, याच इटालिया आणि राज्य चे नेते यांच्या मार्गदर्शनात ही यात्रा होणार असल्याचे श्री भूषण ढाकुलकर नागपूर सचिव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘आज महाराष्ट्रात सर्वत्र प्रशासनच राज्य करत आहे. देशातला आणि जगातली सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणारा भाजप महाराष्ट्रात मात्र हरण्याच्या भीतीने एकही निवडणूक होऊ देत नाही आणि त्यामुळेच प्रशासन मनमानी कारभार करते आहे. भ्रष्टाचारावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. या दडपशाही विरोधात आवाज उठवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील सुराज्य आणण्यासाठी आम आदमी पार्टी वचनबद्ध आहे’

मागील विधानसभा निवडणुकीनंतर विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने युत्या करत सता काबीज करण्याचे प्रयत्न केले. या सर्वच प्रस्थापित पक्षांची विश्वासार्हता संपली असल्यामुळेच महाराष्ट्रातील जनता नवीन पर्याय शोधते आहे आणि आम आदमी पार्टी आज काम की राजनीती करणारा नवा पर्याय म्हणून समोर येत असल्याचा श्री शंकर इंगोल संगठन मंत्री यांनी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles