
सांजवेळ
वाटे दृष्य मनमोहक
सुर्य जाई अस्तास
मन करी प्रसन्न
सांजवेळ ही खास
पक्ष्यांचा चालू होई
परतीचा प्रवास
मुख्या प्राण्यांनाही
घरट्याची आस
गाईगुरे आली
गोठ्यात विसाली
बघून अपूल्या मातेस
वासरे हंबरू लागली
शेतात पोशिंदा
दिवसभर राबला
घराच्या दिशेने तो
सांजवेळी आला
दिवा वृंदावनात
देवघरात लावीला
घर अंगण सर्व
उजळून गेला
स्वजीव प्राणी गाई
सुख दुःखाची गाणी
सांजवेळेत दडल्या
अनेक आठवणी
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
=======