
हरलोय आम्ही
वाट कुठे दिसत नाही
दिशाहीन झालोय आम्ही
आयुष्याच्या या खेळात
आता हरलोय आम्ही
रंगमंच
जीवन एक रंगमंच त्यात
स्वतः असतो कलाकार
विविध भूमिका साकारत
आयुष्याला मिळतो आकार
विश्वासाची वीट
विश्वासाची वीट रचण्यासाठी
असावा प्रामाणिकपणा
दृढ विश्वासासाठी स्वभावात
असावा पारदर्शीपणा
प्रांजली अभय जोशी, विरार, पालघर
==========