‘सुशिला सुतवणी यांचे शताब्दी वर्षात पदार्पण’; हृद्य सोहळा संपन्न

‘सुशिला सुतवणी यांचे शताब्दी वर्षात पदार्पण’; हृद्य सोहळा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

मालेगाव- पूर्वी थोरामोठ्यांना नमस्कार केला की, शतायुषी भव असा आशीर्वाद दिला जात असे. परंतु सध्याच्या काळात मात्र हा योग दुर्मिळ. परंतु मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.कुमार सुतावणी यांच्या मातोश्री श्रीमती सुशिला सुतवणी यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात प्रवेश केला असून त्यांच्या परिवाराने यानिमित्त नुकताच ‘शताब्दी पदार्पण सोहळा’ आयोजित केला होता.

विधीपूर्वक मंत्रोच्चाराच्या गजरात नातवंडे पतवंडेसहीत संपूर्ण परिवाराच्या उपस्थितीत हा हृद्य सोहळा अतिशय भावपूर्ण वातावरणात ‘आग्रसेन भवनात’ संपन्न झाला. यावेळी सुशिलाताईंची ग्रंथतुला करण्यात आली. धार्मिक पूजेनंतर घरातील मंडळींनी मिळून सुशिलाताईंना आवडणारे शास्त्रीय नृत्य , गायन व कविता असे सादरीकरण करून एक अनोखी सा॔कृतिक भेट दिली.

कार्यक्रमास उपस्थित मालेगावमधील प्रतिष्ठीत मान्यवरांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. 100 व्या वर्षी सुध्दा एक आरोग्यपूर्ण व समाधानी आयुष्य जगणा-या सुशिलाताईं आजही कार्यरत असून त्यांची स्मरणशक्ती उत्तम आहे. सर्व परिवारास आपल्यासारखेच दीर्घायुषी राहाण्याचा शुभाशिर्वाद त्यांनी यावेळी दिला. सतत कार्यरत व आनंदी राहणे, सर्वांशी प्रेमाने बोलणे आणि मित आहार घेणे हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे त्यांचे सुपुत्र श्री. कुमार व सूनबाई सौ. शुभांगी यांनी सांगितले. केवळ आपल्या गोड वागण्या-बोलण्याने तिने आज असंख्य माणसं जोडल्याचे श्री. रवी सुतवणी कन्या सौ.सुनिता गोगटे यांनी अभिमानाने नमूद केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles