भारतीय संस्कृती जपणारी ‘टिकली’; वृंदा करमरकर

भारतीय संस्कृती जपणारी ‘टिकली’; वृंदा करमरकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘तिच्या कपाळावरची टिकली चमकली
पैठणी नेसून ती झोकात चालली,
आज चंद्र ढगाआड का लपला..’

स्त्रीच्या जीवनात कुंकू किंवा टिकलीचे महत्त्व खूप आहे. सोळा शृंगारातही कुंकवाला महत्त्वाचे स्थान आहे.

चिरी कुंकवाची लखलख करिते
जीव जडला जडला जडला
खरं वाटंना वाटंना वाटंना

या जुन्या मराठी चित्रपट गीतात कुंकवाची चिरी असा उल्लेख आहे. खरंच पूर्वी स्त्रिया कुंकवाची आडवी रेघ म्हणजेच चिरी कपाळावर रेखत असत. माझी आई, मावशी यांच्या कडे फणीकरंड्याची लाकडी पेटी असायची. त्यात पिंजर कुंकू, मेणाची डबी,फणी (कंगवा), काजळाची डबी आणि लहानसा आरसा असायचा. त्याआधी कपाळावर मेण लावून मग गोलाकार कुंकू लावायच्या. मावशी सांगायची ते मेणही मधमाशीच्या पोळ्यातील असे. ‘कुंकू’ ही सात्विक (भेसळीविना) असे. टिकली विषय इतका जिव्हाळ्याचा आहे की, त्यावर त्रिवेणी करण्याचा मोहच आवरत नाही.

‘तिच्या कपाळावरची टिकली लक्ष वेधत होती
ढगाळलेल्या मनात आठव दाटली होती
कुठंतरी आडोशाला थांबावं म्हणतोय…!

भारतीय संस्कृतीत कुंकवाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. कुंकवाचा इतिहास पाहता फार पूर्वीच्या काळात डोकावावे लागेल. पूर्वी आर्य-अनार्य (द्रविड) टोळ्या होत्या. त्यांच्यात सतत युध्दे होत. त्यावेळी आर्य स्त्रियांना द्रविड किंवा अनार्य पळवून नेत. मग आर्य पुन्हा आपल्या स्त्रियांना युध्दात जिंकून परत आणत. मग या स्त्रियांना शुध्द करण्यासाठी घोड्याच्या रक्ताने त्यांना स्नान घालत. पुढे पुढे त्याऐवजी घोड्याच्या रक्ताचा टिळा स्त्रीच्या कपाळी लावत व तिला
शुध्द करून घेत. यातूनच मग कुंकवाची प्रथा उदयास आली. हा इतिहास रक्तरंजित जरी असला, तरी कपोलकल्पित नाही.

शुध्द कुंकू हळद,हिंगूळ आदि पदार्थ वापरून तयार केले जाते. कुंकू कोरडे असेल तर त्याला ‘पिंजर’ म्हणतात. ओल्या कुंकवाला गंध म्हणत. शुद्ध कुंकवाचा सुगंध ठराविक अंतरापर्यंत दरवळत रहातो. शुद्ध कुंकवात आर्द्रता असूनही ते पूर्णपणे कोरडे असते. त्याचा स्पर्श बर्फासारखा गार असतो. शुद्ध कुंकू रक्तवर्णाचे असते. त्यामध्ये लोह या घटकाचे प्रमाण जास्त असते. हे कुंकू कपाळावर लावल्याने वाईट शक्ती भ्रूमध्यातून प्रवेश करू शकत नाहीत. पूर्वीच्या काळी (सत्य, त्रेता व द्वापार या युगांत) शुद्ध कुंकू मिळायचे; मात्र त्या युगांनुसार कुंकवाची सात्त्विकता कमी कमी होत गेली. हल्ली कलीयुगामध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत लोकच सात्त्विक कुंकू तयार करतात.’

‘कुंकू लावतांना भ्रूमध्य व आज्ञाचक्र यांवर दाब
दिला जातो व तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना रक्‍तपुरवठा चांगला होतो. कपाळावरील स्नायूंचा ताण कमी होऊन चेहरा उजळ दिसतो. कुंकवामुळे वाईट शक्‍तींना आज्ञाचक्रातून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो, असे समजतात. कुंकू हे पावित्र्याचे व मांगल्याचे प्रतीक आहे. कृत्रिम घटकांपेक्षा नैसर्गिक घटकांमध्ये देवतांच्या चैतन्यलहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते. म्हणून पूजापाठ, धार्मिक विधींवेळी पुरुषांच्या कपाळावर सुध्दा कुंकूम तिलक रेखतात. योगशास्त्रानुसार शरीरातील षट्चक्रांपैकी आज्ञाचक्राचे स्थान कपाळावर ज्याठिकाणी कुंकू किंवा टिकली लावली जाते
तेथे आहे. म्हणजे कुंकू लावणे हे एक प्रकारे आज्ञा चक्राचे पूजन आहे.
.
काल ती चांदणी आकाशात चमकत होती
आज ती तिच्या कपाळावरील टिकली म्हणून चमकत होती
हल्ली चांदण्या कुठंही लुकलुकत असतात

कालानुरूप या कुंकवाची जागा टिकल्यांनी घेतली. कारण लावायला सोपी, बाळगायला सोपी, तसेच घाम,पाऊस
याने ओघळायची भीती नाही. टिकली लावली किंवा कुंकू तरी संस्कृतीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न त्यातून दिसतो.भले त्यात आकार, रंग, वेगवेगळे असतील. फँशनचा विचार असेल तरीही टिकलीचे महत्त्वही कमी होत नाही.

उगवत्या सूर्याने जणू कुंकू रेखले भाळी
रात्री चंद्राची चमचमणारी टिकली
कशी विश्व निर्मात्याची किमया सारी

खरंच निसर्गातही ठायी ठायी निर्मिकाची कलाकारी
वेड लावते, चकित करते. त्यात कुंकवाचा तिलकही भासमान होतो.आज आदरणीय राहुलसरांनी त्रिवेणी काव्यस्पर्धेसाठी दिलेला ‘टिकली’ विषय वरवर साधा,सोपा असला, तरी त्याला एखाद्या हिमनगाची खोली आहे. खूप छान विषय आहे. आज अनेक शिलेदारांनी यावर त्रिवेणी लेखन करून स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि लिखाणासाठी खूप शुभेच्छा.

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक, सहप्रशासक
सांगली जिल्हाः सांगली.
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles