क्रन्सा डायग्नोस्टिक केंद्रास केंद्र शासनाची मान्यता

क्रन्सा डायग्नोस्टिक केंद्रास केंद्र शासनाची मान्यता



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे: शहरातील अत्याधुनिक अशा `टेली रेडिओलॉजी हब` च्या
‘क्रस्ना डायग्नोस्टिक’ या सेंटरला केंद्र शासनाच्या नॅशनल ॲक्रिडिएशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) या संस्थेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. अशाप्रकारे ‘एनएबीएच`चे प्रमाणपत्र मिळवणारी `क्रस्ना` ही भारतातील पहिली डायग्नोस्टिक कंपनी ठरली आहे.

डायग्नोस्टिक सेंटरला मान्यता देणारी केंद्र शासनाची एनएबीएच ही संस्था आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण सेवांसाठी रूग्णालये व आरोग्य सेवेतील संस्थांना प्रमाणित करते. या संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार टेली रेडिओलॉजी हबमध्ये आवश्यक त्या सर्व गुणवत्तायुक्त प्रक्रिया राबविल्या जातात. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या ऋग्ण तपासण्या करून त्याचे अत्यंत अचूक असे रिपोर्टस् तयार केले जातात.
‘क्रस्ना डायग्नोस्टिक’ मध्ये रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, टेली रेडिओलॉजी तसेच कॅन्सरशी संबंधीत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व प्रकारच्या रोगनिदान चाचण्या होत असून रूग्णांना परवडेल अशा माफक किंमतीत तपासण्या उपलब्ध करून देणारी कंपनी अशी “क्रस्ना” ची देशभर ओळख आहे.

‘क्रन्सा डायग्नोस्टिक’ विविध राज्य सरकारे तसेच महानगरपालिका यांच्याशी संबंधित पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप पध्दतीने गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणारी एक अग्रणी कंपनी मानली जाते. देशभरात साधारण १७ राज्यांमध्ये या कंपनीचे तीन हजारांहून अधिक सेंटर कार्यरत असलेली ही एकमेव कंपनी आहे. हिच गोष्ट ‘क्रस्ना’ ची गुणवत्तापूर्ण कामगिरी दर्शवण्यास पुरेशी आहे.
देशभरातील विविध राज्यांमध्ये क्रस्नाच्या केंद्रांमधून दोनशेहून अधिक रेडिऑलॉजिस्ट अगदी काही तासांमध्ये अभ्यास व परीनिरीक्षण करून त्याचे अचूक रिपोर्ट रूग्णांना उपलब्ध करून देणारी `टेली रेडिओलॉजी हब` च्या माध्यमातून सेवा देणारी ही `क्रस्ना डायग्नोस्टिक’ ही लोकांची विश्वसनीयता संपादन केलेली कंपनी आहे.

`क्रस्ना` च्या वतीने देशभरातील केंद्रांमधून साधारण प्रत्येक दिवशी ५ हजारांहून अधिक आणि महिन्याला १ लाख ५० हजार तपासण्या केल्या जातात. त्याचप्रमाणे महिन्याला ५ लाखांहून अधिक ‘एक्स रे’ काढले जातात. एवढ्या मोठ्या संख्येने होणाऱ्या रोगनिदान चाचण्यांचे रिपोर्टस् अवघ्या काही तासांत या अत्याधुनिक या `टेली रेडिओलॉजी हब` च्या माध्यमातून होतात, ते आत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि प्रशिक्षित कुशल तंत्रज्ञांमुळे होय. सामान्य रूग्णांना परवडेल अशा किंमतींमध्ये रोगनिदान चाचण्या उपलब्ध करून देणे हे कंपनीचे ध्येय आहे.

रोगनिदान क्षेत्र व रूग्ण सेवेमध्ये कंपनी करीत असलेल्या प्रयत्नांना एनएबीए कडून नुकताच प्राप्त झालेल्या प्रमाणपत्रामुळे अधिक बळ मिळाले असून `टेली रेडिओलॉजी हब` च्या गुणवत्तापूर्ण व तत्पर सेवेला एक प्रकारे पाठींबा मिळाला आहे, याबाबत `क्रस्ना`च्या संपूर्ण टीमला मोठा आनंद झाल्याचे क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेडचे अध्यक्ष,
राजेंद्र मुथा यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles