
घुसमट
माझ्या मनाची घुसमट
कशी सांगू रे विठ्ठला
इतका सुंदर देह देऊनि
व्यर्थ तो मी घातला
मतलबी पणाचा सर्व
मांडला मी बस्थान
माझे माझे करता करता
समाजासाठी झालो बेमान
माझं हित साधण्यासाठी
करत होतो तुला प्रार्थना
ज्या समाजात वावरतो
त्यासाठी केली नाही याचना
सुखात नादंत असतांना
झाली नाही तुझी आठवण
संकटाच्या जाळ्यात अडकता
शोधू लागलो मी चरण
अंहकार घे माझा पदरात
फेकतो स्वार्थ मनाची जळमट
मी पणाच्या प्रपंचात आता
सहन होईना ही घुसमट
कुशल गो डरंगे, अमरावती
====