महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ‘पु.ल. देशपांडे’ यांच्या स्मृतींना अभिवादन

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ‘पु.ल. देशपांडे’ यांच्या स्मृतींना अभिवादन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे: मराठी साहित्यात ज्यांच्या निखळ विनोदाने हास्याची कारंजी फुलत असत आणि ज्यांच्या हलक्याफुलक्या विनोदाने मराठी माणसाचं मन प्रसन्न होत असे, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांचा २३ वा स्मृतिदिन अखिल भारतीय साहित्य परिषद आणि राजा दिनकर केळकर संग्रहालय यांनी संयुक्तपणे साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोदी लेखक व वक्ते श्याम भुर्के हे होते. केळकर संग्रहालयात आयोजित या कार्यक्रमात “पुलं : एक आनंदयात्रा ” हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात पुलंच्या गाजलेल्या ‘वाऱ्यावरची वरात” या नाटकातला ‘रविवारची सकाळ’ हा प्रवेश उपस्थितांना खळखळून हसवणारा ठरला. गझलकार दीपक करंदीकर यांनी पुलंच्या ‘गुण गाईन आवडी’ या पुस्तकातील ‘विज्ञानयोगी बाबा आमटे’ या प्रकरणाचे अभिवाचन केले.पुलं वरील कवितेचेही यावेळी वाचन करण्यात आले. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी पु.ल. यांच्या साहित्याचा वेध घेणारे प्रास्ताविक मांडले.

उपस्थितांपैकी काही रसिक वाचकांनी पुलंचे साहित्य का आवडते, ते उत्स्फूर्तपणे उलगडून सांगितले. डॉ. सुनील भंडगे, कवी बाबा ठाकूर यांनी पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या आठवणी भावपूर्ण शब्दात जागवून हा स्मृतीजागर सार्थ केला. कार्यक्रमास पुल॔चे चाहते आणि दोन्ही संस्थांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles