
नागपुरात महिला डॉक्टरचा पर्दाफाश; निघाला पुरूष
_तरूणाईचे आकर्षण असल्याने हे कृत्य केल्याचे केले कबूल_
नागपूर: शहरात दररोज अजब गजब व आश्चर्यचकित करणा-या घटनामंध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार आज नागपूर शहरात घडला. एक संशयित महिला डॉक्टर गेल्या १५ दिवसांपासून मेयो रुग्णालयात फिरत होती. तिच्यावर तैनात असलेल्या पोलिसांची मागील काही दिवसापासून नजर होतीच. त्या महिला डॉक्टरच्या काही संशयास्पद हालचालीवरून, आज तेथील एमएसएफ जवानाने त्या महिला डॉक्टरला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे, एका महिलेच्या पोशाखात एक पुरुष होता.
डॉक्टर महिलेचा पर्दाफाश झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले असून, महिला डॉक्टरच्या वेशात असलेला जावेद शेख असे आरोपीचे नाव सांगण्यात आले. तरूण मुलांमध्ये विशेष आकर्षण व रस असल्याने आरोपी जावेद हा मुलगी झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील पुढील तपास तहसील पोलीस करीत आहे. पण या अनोख्या घटनेची चर्चा नागपूरकरांना घाबरवून सोडणारी नक्कीच आहे.