
शेकडो वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड रस्ता विस्तारीकरणात जमीनदोस्त
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद: फू.ना. ते बा. ना. या शहरातील मुख्य रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या रस्त्यावरील शेकडो वर्ष जुने पिंपळाचे झाड रस्ता विस्तारीकरणात पाडल्यामुळे तेथील परीसर भकास दिसत आहे.
बहुचर्चित औंढा ते माहूर फाटा या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरू असून मुंबई स्थित ईगल कन्ट्रक्शन कंपनी सदरील काम संथगतीने करीत आहे.या रस्त्यावर आतापर्यंत अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी पासून सदरील काम सुरू असून येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयापासून ते माहूर फाटा पर्यंत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम होत आहे लगत ड्रेनेज नाल्या व रस्त्या आड येणारे विद्युत खांब स्थलांतरित करण्यात येत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या नवीन पोलीस चौकी समोरील शेकडो वर्षांपूर्वी चे जुने पिंपळाचे वृक्ष हे रस्ता विस्तारीकरणाच्या कामाच्या आड येत असल्यामुळे त्याची समूळ उच्चाटन करण्यात आली आहे.त्यामुळे हा परीसर भकास दिसत आहे.हा रस्ता विस्तारीकरणात अनेक झाडांची कत्तल झाली असून नव्याने झाडे लावण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.