कल्याण येथे द्वितीय राज्यस्तरीय काव्यसंमेलन उत्साहात संपन्न

कल्याण येथे द्वितीय राज्यस्तरीय काव्यसंमेलन उत्साहात संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

कल्याण: येथे दिनांक १८जून २०२३ रोजी समाजभूषण आणि साहित्यिक मा.अनिता प्रविण कळसकर यांनी के.एम.अग्रवाल महाविद्यालयाच्या सभागृहात निमंत्रितासाठी भव्य राज्यस्तरीय काव्यसंमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक भागांतून कवी/ कवयित्री यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली .या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी मा.राजीव जोशी आणि मॅक्स महाराष्ट्रचे वरिष्ठ पत्रकार मा.किरण सोनावणे यांनी स्वीकारले.

कार्यक्रमाची सुरूवात वरिष्ठ महिला सहायक पोलीस निरीक्षक मा.संगीता सुरवसे, संमेलनाध्यक्ष मा.दत्तप्रसाद जोग,कवी मा. राजीव जोशी तसेच जनजागृती सेवा समितीचे संस्थापक मा.गुरूनाथ तिरपणकर, के.एम.अग्रवाल महाविद्यालय च्या मराठीच्या विभागाच्या प्रमुख मा.मीनल सोहोनी, तसेच या कार्यक्रमाचे सर्वोसर्वा लेखिका/ कवयित्री/संपादिका मा.अनिता प्रविण कळसकर या सर्वांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

त्यानंतर काॅलेजचे सहसचिव डॉ ओमप्रकाश पांडे सरांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि नंतर सर्व मान्यवरांचे आयोजिका मा.अनिता कळसकर यांनी शाल, पुष्पगुच्छ तसेच शब्दसुमने साहित्यिक मंच चे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाची सुरुवात कु. देवयानी महाजन हिच्या गोड आवाजातील स्वागत गीताने झाली. प्रमुख पाहुणे मा.राजीव जोशी यांनी आपल्या चॅटमॅट या सुंदर अशा कवितेने संमेलनास सुरूवात केली.तसेच मॅक्स महाराष्ट्र चे वरिष्ठ पत्रकार मा.किरण सोनावणे यांनी बोकड नावाची वास्तव रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली, प्रत्येक कवीने आपल्या खास अशा शैलीत कवितेचे सादरीकरण केले.

उपस्थितांमध्ये ज्येष्ठ गझलकार मा अजित मालणकर, कवयित्री निलांबरी बापट ,माधुरी वैद्य, स्वाती नातू , मृणाल जोशी, अश्विनी मुजुमदार, बापूसाहेब सोनावणे, ज्योती गोळे,सागरराजे निंबाळकर, श्रीशैल सुतार,जयराम पाटील,आकाश पवार, हरिश्चंद्र धिवार, प्रमोद सुर्यवंशी,दिपश्री ईसामें, चंद्रपूरचे मोहम्मद अब्दुल रहीम, ललिता गाढवे ,पद्माकर भावे, संगीता राजपूत, इ.अनेक कवींनी या राज्यस्तरीय काव्यसंमेलनाला हजेरी लावली. सर्वांनी नाश्त्यानंतर तर कार्यक्रमात रंगत आणली .यावेळी संमेलनाध्यक्ष मा.दत्तप्रसाद जोग यांनी कवितेवर थोडेसे सर्वांना बोलते केले.जोग यांनी ज्येष्ठ कवींनी नवोदित कवींवर सतत टिका करणे सोडले पाहिजे असे सांगून गझलेने सर्वांची मने जिंकली .जोग यांनी निखळ कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी गोव्याहून आपल्या कल्याण या ऐतिहासिक नगरीत आपली उपस्थिती दर्शविली,यासाठी शब्दसुमने साहित्यिक मंच घ्या संस्थापिका आणि काव्यसंमेलन च्या आयोजिका मा.अनिता कळसकर यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.उपस्थितांमध्ये ज्येष्ठ कवी मा.शिवाजी गावडे,तसेच मा.कमलाकर राऊत यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली .अशा या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले म्हणून सर्वांनी लेखिका/कवयित्री/संपादिका -मा.अनिता कळसकर यांचे अभिनंदन केले ,तसेच ज्येष्ठ कवी राजीव जोशी यांनी व्यासपीठावरून बोलताना तर अनिता कळसकर ताईंनी अशी संमेलने नेहमी भरवावीत असे सांगितले.निवेदिका जनशक्ती च्या अॅकर मा.ललिता मोरे यांनी नेहमीसारख्या आनंदी आणि हसतखेळत या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ,त्यासाठी अनिता कळसकर यांनी निवेदिका ललिता मोरे यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरविले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles