बा. ना. सुतगिरणीच्या निवडणुकीत सर्वच जागांवर मनोहरराव नाईक यांच्या गटाचे उमेदवार विजयी

बा. ना. सुतगिरणीच्या निवडणुकीत सर्वच जागांवर मनोहरराव नाईक यांच्या गटाचे उमेदवार विजयीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: पुसद व महागाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणारी बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणी म. पिंपळगाव (कान्हा ) च्या सन २०२३- २०२८ च्या संचालक मंडळाकरिता निवडणूक दि. १७ जून रोजी पार पडली.

दि. १७ जून रोजी बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाकरिता सरासरी ६३.१०टक्के मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण २१ संचालक मंडळ संस्थेच्या कार्यकारी मंडळावर असतात यापैकी ९ उमेदवार
अविरोध निवडून आले. तर कापूस उत्पादक मतदार संघात ११जागेसाठी १६ उमेदवार असल्यामुळे दि. १७ जून रोजी १० मतदान केंद्रावर मतदान पार पडले होते. एकूण ३००६ मतदारांपैकी १८९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ६३.१० टक्के आहे. माजी मंत्री मनोहर नाईक पॅनल व वसंतराव नाईक शेतकरी आघाडीचे पॅनल या निवडणुकीत उभे ठाकले होते.

वसंतराव नाईक शेतकरी आघाडी पॅनलने सहा जागा लढविल्या. डॉ. मोहम्मद नदीम, पंजाबराव देशमुख खडकेकर यांनी पॅनलची धुरा सांभाळली परंतु माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या गटाचे सर्व च्या सर्व उमेदवार निवडून आले.
निवडणूक झालेल्या १२ जागांपैकी ईतर मागासवर्ग प्रवर्गात एकास एक लढतीत विनोद उत्तमराव सुरोशे यांना १६७१ तर जयंत भाऊराव चौधरी यांना १३५ मते मिळाली आणि तब्बल ८१मतपञिका अवैध ठरल्या . कापूस उत्पादक गटात ११जागांसाठी १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यापैकी मनोहरराव नाईक गटाचे ११ही उमेदवार प्रचंड मताधिक्य मिळवून विजयी झाले.

यात धनंजय गोवर्धन सोनी 1632, अमित तुकाराम आडे 1580 राजेश मधुकर आशेगावकर 1567 गणपती ज्ञानबा काळे 1579 गजानन जगन्नाथ चौरे 1557 1564 विलासराव दंगाले 1553 नयरखा कौसर खा 1545 दिलीप बाबाराव पाटील 1577 दिगंबर पाचकोरे 1532 मिर्झा १516 हे अकरा उमेदवार निवडून आले असून पंजाबराव देशमुख खडके कर यांना 158 डॉक्टर मोहम्मद नदीम यांना 121 अनिल शिंदे 122 आणि दिलीप बेंद्रे पाटील 118 अशी मते मिळाली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles