प्रसिद्ध विचारवंत दिवाकर मोहनी यांचे निधन

प्रसिद्ध विचारवंत दिवाकर मोहनी यांचे निधनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: गांधीवादी कुटुंबातील नागपुरातील धरमपेठ येथील सुप्रसिद्ध विचारवंत आणि भाषातज्ज्ञ दिवाकर मोहनी यांचे सोमवारी 19 जून 2023 निधन झाले. मृत्युसमयी ते 92 वर्षांचे होते. वृद्धापकाळाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असल्याने सकाळी 10.40 वाजता त्यांनी देह सोडला.
त्यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1931 रोजी नागपुरात झाला.

गांधीवादी कुटुंबात जन्मलेले दिवाकर मोहनी हे मुद्रण आणि देवनागरी लिपीचे अभ्यासक होते.मराठीतील बुद्धिवादाच्या ‘आजचा सुधारक’ मासिकाचे माजी संपादकही होते. स्त्री स्वातंत्र्य, धर्म, संपत्तीचे स्वरूप यासह विविध विषयांवर त्यांनी तर्कसंगत आणि नवीन वैचारिक तत्त्वज्ञान मांडले. त्यांचे देवनागरी लिपीवरील ‘माय मराठी… कशी लिहावी…कशी वाचावी..’ हे पुस्तक लिपीवरील संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.

जेष्ठ विधिज्ञ श्री के.एच. देशपांडे यांचेशी त्यांचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या विनंतीवरुन सुप्रसिद्ध कामगार नेते आणि राज्यसभा सदस्य श्री.पु.य. देशपांडे यांनी लिखित “अमृतानुभव रसरहस्य” या संत ज्ञानेश्वरांच्या भाष्यावर लेखन केलेल्या पाच खंडात प्रसिध्द झालेल्या ग्रंथाचे पुनर्प्रकाशन करण्यात दिवाकररावांनी मोलाचे सहकार्य केले. हा ग्रंथ मुद्रित व प्रकाशित करुन श्री विजय लपालीकर व अॕड. राजीव देशपांडे यांच्यासह केलेल्या या सांधिक कार्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापिठातील तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांना अमुल्य वैचारिक देणगी मिळाली आहे.

दिवाकररावांचे नागपूरातील अग्रगण्य संस्था -मातृसेवा संघाशी अतूट नाते होते. त्यांच्या भगिनी कमलाताई होस्पेट यांनी ही संस्था उभी केली होती हे सर्वश्रृत आहे. दिवाकर मोहनी यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे “भाशाव्रती” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि त्यांच्या ‘शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान’ या पुस्तकासाठी त्यांना विदर्भ साहित्य संघातर्फे “डॉ.व्ही.व्ही. मिराशी स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

त्यांच्या पश्चात त्यांची सुविद्य पत्नी सुनंदा व एकमेव चिरंजीव भरत व अनुराधा मोहिनी ही मोठी मुलगी तर यशोदा सावरकर ही छोटी कन्या तसेच आप्तेष्ट त्यांच्याशी वैचारिक बैठकीतील अनेक व्यक्ती, संस्था शोकाकुल झाले आहेत. दिवाकररावांनी देहदान केले असून आज मंगळवारी दुपारी त्यांचे पार्थिव दान करण्यात असल्याचे कळविले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles