
कोरडे हुंदके
बाप कर्जाच्या तणावात
दोर गळ्याला लावून मेला
पंचनामा , मदतीचा हात
नेता कोरडे हुंदके देत गेला
एकटी गाठून लिंगपिसाट
लुटतात कोवळ्या कळीला
बलात्कारीत कलंकी बाट
कोरडे हुंदके अशा बळीला
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
चार भिंतीच्या आडचा छळ
बापाच्या नावार्थ सोसे वार
सर्वांगावर उमटले जरी वळ
संपत्तीचा हव्यास नडतोय
पोटचा पोरगा करतोय घात
बाप वृद्धाश्रमी का रडतोय
कुलदीपक का असली जात
अपघाती शेकडो मृत्यू रोज
सोयरसुतक नाही रे कुणाला
कोरडे हुंदके देतही ती मौज
जननीच्या विसरून ऋणाला
बेगडी मुखवट्यांचा बाजार
जिकडे तिकडे भरलाय भारी
स्वार्थाचा जडलाय आजार
जगण्यास मिळेल का उभारी
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर