
फारकत
तनाने फारकत होती मनाने आता झाली.
दोघांची ती दुनिया अचानक उध्वस्त झाली.!धृ!
तूझ्या चुकांवर नेहमी पांघरून घालत होते.
तुझ्यासाठी घरच्यांशी वाद करीत होते.
रचलेल्या तुझ्या डावात कशी अडकून गेली.
दोघांची ती दुनिया अचानक उध्वस्त झाली.!1!
वळणा वळणावर तुझे खोटे बोलणे होते.
मी मात्र भावनिक गुंत्यात गुंतत होते.
विश्वासाची पट्टीही आता सैल झाली.
दोघांची ती दुनिया अचानक उध्वस्त झाली.!2!
सरड्यासारखा रंग तू बदलत होता.
स्वार्थ तितका साधून अलिप्त झाला होता.
बेगडी तुझ्या वृत्तीस मी फसल्या गेली.
दोघांची ती दुनिया अचानक उध्वस्त झाली.!3!
प्राजक्ता आर खांडेकर
सुगत नगर, नागपूर
=======