आत्मविश्वास..

आत्मविश्वासपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘आत्मविश्वास’ हा यशाचा पाया आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,’If you want to be success ,You will be narrow minded.’जर तुम्हाला यश हवे असेल तर एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. कुस्तीच्या आखाड्यात ताकदवान पैलवान बघून गर्भगळीत झालेला पैलवान कुस्ती कधीच जिंकू शकत नाही.जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराजां’च्या पराक्रमाच्या अनेक गाथा आपण वाचतो .त्यांनी पण कित्येक वेळा ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ या तत्त्वाचा वापर केला. म्हणून तर प्रतापगडावरील अफजलखानाच्या भेटीच्या वेळी बलाढ्य अशा खानाला युक्तीने ठार मारले. कारण त्यांच्याजवळ होता तो आत्मविश्वास. आत्मविश्वास असेल तर माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो.

अशीच एक गोष्ट सांगणार आहे रमा आणि राघवची. दोघेही लहानपणापासून राहायला शेजारी शेजारी. बालवयापासून तारूण्यवस्थेपर्यंत कायम एकमेकांची साथ. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता कारण रमा पदवीधर होती, राघव रिक्षा चालवत होता, दहावी शिकलेला, गरजेपुरते शिक्षण त्याचं. रमा मात्र लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेची. शालेय जीवनात अनेक प्रमाणपत्र ट्रॉफी मिळवलेली. तिच्या घरच्यांच्या तिच्याकडून फार अपेक्षा होत्या. तिच्या वडिलांना वाटायचं माझ्या पोरीला क्लास वन ऑफिसर नवराच मिळायला हवा पण ठरवतो तसं घडलं तर ते आयुष्य कुठलं? झालं प्रेम आंधळं असतात म्हणतात ना तसंच घडलं रमाच्या जीवनात. एक दिवस दोघांनी प्रेम विवाह केला. सुरुवातीचे दिवस मनाला ओढ लावणारे, गोडी गुलाबीचे छान चालले होते. रमा संसारात एवढी खुश होती की जगात माझे एवढे सुखी कोणी नाही असं तिला वाटायचं. राघवाला परिस म्हणायची. तुझ्या पायातले काटे माझ्या पापण्यांवर झेलण्याची तयारी आहे असं प्रेमाने त्याला म्हणायची. तोही तिच्यावर तेवढाच जिवापाड प्रेम करायचा. नंतर तिला शिक्षिका म्हणून नोकरी लागली. राघव पण रिक्षा चालवायचा. संसार सुखात चालला होता. नंतर या संसार वेलीवर एक फुल जन्माला आलं दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं नाव ठेवलं तिचं समृद्धी. तिच्या येण्यानंं आयुष्यच पार बदलून गेलं. सुख ओसंडून वाहू लागलं.

थोड्या दिवसांनी संसार वेलीवर दुसरे फुल जन्माला आलं. जणू संसाराचा चौकोन पूर्ण झाला. बघता बघता पोरं मोठी झाली शाळेत जाऊ लागली. राघवला वाटू लागलं रिक्षाच्या व्यवसायावर आपण किती कमवू शकतो, थोडी मोठी झेप घ्यायला हवी. म्हणून त्याने सावकारांकडून कमी व्याजदराने पैसे घेऊन लोकांना थोडा व्याजदर वाढवून पैसे वाटायला सुरुवात केली. सुरुवातीला पैसे चांगले मिळाले पण नंतर मात्र तो पूर्ण कर्जात बुडाला. ओळखीच्या लोकांना त्याने दिलेला त्याचा पैसा परत न करता ते त्यालाच धमकावू लागले. बघता बघता कर्जाचा डोंगर झाला. राघव नैराश्याच्या गर्तेत गेला. पण रमा मोठ्या धीराची. तिने नवऱ्याला खचू न देता स्वतःच्या नावावर कर्ज काढून लोकांची देणी फेडली पण ती मात्र कर्जातच राहिली. लोकांचे पैशावरून टोमणे मारणे, स्वतःचा मोठेपणा मिरवणे.. थोडक्यात पैशाचा माज असलेली माणसं तिला अनुभवायला मिळाली. मुलं मोठी होत होती पगार कर्जाच्या हप्त्यातच जात होता पण तिला दांडगा आत्मविश्वास होता.

लेखिका रॉन्डा बर्न यांच्या ‘द सीक्रेट’ या पुस्तकाचे मराठीत डॉ. रमा रानडे यांनी अनुवादित केले , त्याचं तिने खूप पारायण केलं होतं. यशामागे आकर्षणाचा नियम असतो LAW OF ATTRACTION तिला पटला होता. तिच्या वडिलांचं तिला सांगितलेलं एक वाक्य नेहमी आठवायचं, चांगल्या ठिकाणी दिवा कोण पण लावतो पण तुला वादळात दिवा लावायचा आहे. हार कधी मानली नाही परिस्थिती पुढे शरणागती कधी पत्करली नाही. ‘विझलो आज जरी मी,हा माझा अंत नाही,पेटेन उद्या नव्याने,हे सामर्थ्य नाशिवंत नाही.’ या कवी सुरेश भटाच्या ओळी तिची ढाल बनायच्या. तिने खूप अभ्यास केला खात्याअंतर्गत परीक्षा दिल्या. सुरुवातीला अपयश आलं; नंतर मात्र यश तिच्या दारी आलं. राघवने पण आता इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान टाकले. परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. ती नेहमी राघवला लेखक शिव खेरा यांच्या ‘यश तुमच्या हातात’ या पुस्तकातलं वाक्य सांगायची.’ विजेते’ वेगळी गोष्ट करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळीपणाने करतात. आणि तिने नेमकं हेच केलं होतं स्वतःचा निर्णय सिद्ध केला होता. घुसमट व्हायची मनाची पण सकारात्मकता तिच्या मनात खोल भरली होती. YES I CAN DO IT म्हणून प्रत्येक गोष्ट आव्हान म्हणून स्वीकाराची. समृद्धी आणि अविराज शाळा शिकू लागले आईसारखे दोघेही बुद्धिमान. संसार सुखाचा छान सूरू झाला होता. जिथं पूर्ण संपले अशी अवस्था होती तिथे तिने शून्यातून केवळ आणि केवळ आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःचं विश्व उभारल होतं. सलाम तिच्या जिद्दीला!!

स्नेहल संजय काळे
फलटण, सातारा
==========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles