
माजी सैनिकांचे प्रदेश कार्यालय आता पुण्यात
_सेवा परिषदेच्या कार्यालयाचे उद्घघाटन_
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे: अखिल भारतीय माजी सैनिक सेवा परिषदेच्या महाराष्ट्र व गोवा प्रदेश कार्यालयाचे उद्घघाटन नुकतेच पुण्यात करण्यात आले असून या निमित्ताने पुण्यात कार्यालय उपलब्ध झाल्याने संघटनेच्या कार्यवाढीसाठी व विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी हे कार्यालय उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन करून राष्ट्रीय आपत्तीमध्ये माजी सैनिकांचे योगदान खूप मोठे असल्याने महाराष्ट्र व गोवा राज्याची ही संघटना राज्याचे व राष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक मा.रवींद्र वंजारवाडकर यांनी या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष एअर मार्शल प्रदिप बापट (निवृत्त),सचिव वीरेंद्र महाजनी ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
‘अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद’ ही राष्ट्रीय पातळीवरील माजी सैनिकांसाठी कार्य करणारी नोंदणीकृत व केंद्र सरकारची एकमेव मान्यताप्राप्त संघटना आहे. या माध्यमातून माजी सैनिकांसाठी व त्यांचे कुटुंबिय यांच्या हितरक्षण अनेक वर्षांपासून कार्य केले जात आहे.
सीमेवर जसे सैनिक आपले रक्षण करतात, तसे अंतर्गत सुरक्षतेसाठी ‘अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद’ यांनी समाजाचे नेतृत्व करावे,अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली.
कार्यालय उदघाटन प्रसंगी एअर व्हॉईस मार्शल जयंत इनामदार ( निवृत्त ),संस्थापक सदस्य एअर कमोडर अरुण इनामदार(निवृत्त), पश्चिम महाराष्ट्र सचिव निवृत्त कर्नल नरेश गोयल,सचिव वीरेंद्र महाजनी,एअर फोर्स असोसिएशनचे पदाधिकारी व निवृत्त विंग कमांडर सुहास फाटक,निवृत्त ब्रिगेडियर धनंजय विध्वांस, योगेश गोगावले, एअर व्हॉईस मार्शल नितीन वैद्य (निवृत्त),माजी सैनिक कल्याण संघटक दीपक शेळके, संजय गायकवाड, संघटन मंत्री अशोक बोराटे, डॉ मोरेश्वर गद्रे, माधव देशपांडे इत्यादी सन्माननीय पदाधिकारी व परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद’ चे हे कार्यालय पौड रोडवर ईशदान सोसायटीच्या ‘प्रार्थना’ ईमारतीमध्ये आनंदनगर मेट्रो स्टेशन जवळ, स्थित आहे.