
अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन ची नविन कार्यकारिणी जाहीर
_अध्यक्षपदी तुषार थळे यांची निवड_
अलिबाग: अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन ची नविन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी तुषार थळे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी राकेश दर्पे, कार्याध्यक्ष सुदेश माळी तसेच सचिव म्हणून विकास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सहसचिव म्हणून अमोल नाईक,
खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार, प्रणेश म्हात्रे तर सल्लागार सचिन म्हात्रे, सचिन असराणी, सुरेश खडपे यांची निवड झाली.
विद्यमान अध्यक्ष समीर मालोदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आली होते. रायगड जिल्हा फोटोग्राफर आणि व्हिडिओ ग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली. त्या वेळी रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनचे खजिनदार जितेंद्र मेहता व अमर मढवी, विराज घरत हे सदस्य उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे मावळते अध्यक्ष समीर मालोदे यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.