कैद्यांना कुटुंबाशी फोनवर बोलता येणार; पुण्यातील येरवडा तुरूगांत पहिला प्रयोग

कैद्यांना कुटुंबाशी फोनवर बोलता येणार; पुण्यातील येरवडा तुरूगांत पहिला प्रयोगपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे: शहरातील येरवडा कारागृहाला ऐतिहासिक महत्व आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल आणि मोतीलाल नेहरू यांच्यासह असंख्य स्वातंत्र्य सैनिक या कारागृहात राजकीय कैदी होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी या ठिकाणी त्यांनी तुरुंगवास भोगला होतो. अगदी 1932मध्ये येरवडा तुरुंगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे करार झाला होता. इंग्रजांचे पुण्यातील कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड यांच्या हत्येप्रकरणी चाफेकर बंधूंना या ठिकाणी फाशी दिली होती. अशा या ऐतिहासिक कारागृहात कैद्यांसाठी नवीन सुविधा सुरु करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही सुविधा आहे.

*काय होणार कैद्यांसाठी सुरु*.

पुण्यातील येरवडा कारागृहामधील कैद्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. येरवडा कारगृहात असणाऱ्या कैद्यांना फोनची सुविधा मिळणार आहे. त्यांना या फोनमुळे कुटुंबाशी संवाद साधता येणार आहे. प्रत्येक महिन्यातून ३ वेळा घरच्यांशी किंवा नातेवाईकांशी त्यांना फोनवर बोलता येणार आहे. अपर पोलिस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते आज येरवडा कारागृहात स्मार्ट कार्ड फोन सुविधेच उद्घाटन करण्यात आलं.

*का घेतला निर्णय?
कैद्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिकेतच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. कैद्यांना महिन्यातील ३ वेळा ही सुविधा उपलब्ध असेल. प्रत्येक कॉलवर कायद्याला आपल्या घरच्यांसोबत किंवा आपल्या आप्तेष्टांसोबत १० मिनिटे बोलता येणार आहे. म्हणजेच एक कैदी महिन्यातून 30 मिनिटे आपल्या घरच्यांशी बोलू शकणार आहे. स्मार्ट कार्ड फोन सुविधा हा राज्यभरातील पहिला प्रकल्प आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles