नाशिकच्या आदिवासी उपायुक्तांना पदाचा मोह सुटेना; बदलीच्या आदेशाला केराची टोपली

नाशिकच्या आदिवासी उपायुक्तांना पदाचा मोह सुटेना; बदलीच्या आदेशाला केराची टोपलीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून बदली होऊनही आदिवासी विकास उपायुक्त अविनाश चव्हाण हे शासनाच्या बदली आदेशाला केराची टोपली दाखवत या पदावर ठाण मांडून बसले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा असा ‘अडेलतट्टूपणा’ वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सहन केला जात असल्याने संशय निर्माण झाला आहे.

विविध कारणांनी आदिवासी विकास विभाग हा कायमच चर्चेत असतो. विशेष करून आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाकडून या विभागाला कोटयवधींचा निधी दरवर्षी दिला जातो. विविध एनजीओ, तसेच आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून आदिवासी विकासाच्या योजना राबविल्या जातात. त्यामुळे मलईदार खाते म्हणून अनेक अधिकारी या विभागात काम करण्यास इच्छुक असतात. अनेक अधिकारी वर्षानुवर्षापासून एकाच पदावर ठाण मांडून बसलेले दिसून येतात. विभागाची खडान् खडा माहिती असल्याने अशा अधिकार्‍यांना राजकीय वरदहस्तही लाभतो. त्यामुळे अशा अधिकार्‍यांचे फावते देखील.

नाशिक आदिवासी विकास आयुक्तालयात असे अनेक अधिकारी आहेत. मध्यंतरी शासनाने बदल्यांचे आदेश जारी केले. यापैकी आदिवासी विकास उपायुक्त अविनाश चव्हाण यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई येथे बदली करण्यात आली. बदलीनंतर संबधितांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे १५ जूनच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्यास किंवा कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास अधिकार्‍यांविरूध्द शिस्तभंग कारवाई सुरू करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र, सदरचे अधिकारी पदमुक्त होण्यास राजी नसल्याचे समजते.

त्यांची बदली रद्द करण्याकरिता एक वरीष्ठ अधिकारीच प्रयत्नशील असल्याचीही चर्चा आहे. संबंधितांच्या बदलीमुळे कामे रखडतील असे अजब कारण पुढे केले जात आहे. रिक्त जागेवर शासनाकडून दुसर्‍या अधिकार्‍याची नियुक्ती केली जाईलच. परंतु, मग असे काय कारण आहे की याच अधिकार्‍यांनी या पदावर कायम राहिल्यास कामे मार्गी लागतील का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणातून वेगळाच संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, येत्या काही काळात आदिवासी विकास विभागात अनेक महागड्या निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे समजते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles