
कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे नूतन उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी हिंगोली यांचा सत्कार
हिंगोली: आज दिनांक 23 जून 2023 रोजी गट साधन केंद्र पंचायत समिती हिंगोली येथे कास्ट्राईब शिक्षक संघटना हिंगोली च्या वतीने उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद हिंगोली येथे नव्यानेच नियुक्त झालेले मा.गजानन गुंडेवार व हिंगोली पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मा.बिरमवार साहेबांचा शाल,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा हिंगोली चे जिल्हाध्यक्ष मा.रमेशदादा खंदारे, संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष भीमराव तुरुकमाने, सेमचे अजिंठा संयोजक प्रल्हाद बनसोडे, जिल्हा सरचिटणीस प्रवीण रुईकर,अतिरिक्त सरचिटणीस बबनराव दांडेकर, कार्याध्यक्ष वामन इंगोले, उपाध्यक्ष मधुकर भालेराव ,पि.के बिले, सी.सी खिल्लारे, हिंगोली तालुका अध्यक्ष बबनराव गायकवाड, उपाध्यक्ष समाधान पाईकराव, सहसचिव रवींद्र पठाडे, तालुक्याचे प्रवक्ता प्रदीप घोडगे,कार्यकारीणी सदस्य विष्णू घनसावंत, कळमनूरी तालुका शाखेचे सहसचिव दीपक कटकुरी, तुकाराम जावळे ,सेनगाव तालुक्याचे सचिव भीमराव नेतने, शालिक गायकवाड, प्रभू अंभोरे हे उपस्थित होते.
सत्कार समयी पंचायत समिती कळमनुरी चे गटशिक्षणाधिकारी मा.दत्ता नांदे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा. कैलासराव भुजंगळे साहेबांची आवर्जून उपस्थिती होती.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन उपशिक्षणाधिकारी मा.गजानन गुंडेवार गटशिक्षणाधिकारी मा.बिरमवार साहेबांना त्यांच्या नवनियुक्तीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्यात.