आजचे दिनविशेष: दिनांक २६ जून २०२३ सोमवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔴 आजचे दिनविशेष🔴*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📘दिनांक: २६ जून २०२३: सोमवार📘*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*♻️महत्त्वाच्या घटना:♻️*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*१८१९: सायकलचे पेटंट देण्यात आले.*

*१९०६: पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.*

*१९४९: बेल्जियम देशांतील महिलांना प्रथमच संसदीय निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क मिळाला.*

*१९६८: पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्‍घाटन झाले.*

*१९७४: ओहायो (अमेरिका) येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.*

*१९७४: नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ*

*१९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीचा वटहुकूम जारी केला.*

*१९७९: मुष्टियोद्धा मुहम्मद अली यांनी निवृत्ती घेतली.*

*१९९९: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करुन माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.*

*१९९९: पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या हस्ते शिवाजीराजांची मुद्रा असलेले २ रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.*

*२०००: पी. बंदोपाध्याय या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.*

*🏵️जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:🏵️*

*१८३८: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक व सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचा कंतलपाडा परगणा बंगाल येथे जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)*

*१८७३: अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)*

*१८७४: छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक (मृत्यू: ६ मे १९२२)*

*१८८८: नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ ‘बालगंधर्व’ – गायक व अभिनेते (मृत्यू: १५ जुलै १९६७)*

*१९१६: मराठ्यांच्या ग्वाल्हेर राज्यातील सिंधिया घराण्याचे शेवटचे शासक महाराजा जिवाजीराव सिंधिया यांचा जन्मदिन.*

*१९१८: परमवीर चक्र सन्मानित माजी भारतीय सैन्य अधिकारी मेजर रामा राघोबा राणे यांचा जन्मदिन.*

*१९५१: गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू*

*१९९२: अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय हॉकी खेळाडू मनप्रीत सिंह यांचा जन्मदिन.*

*♦️मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:♦️*

*१८१०: हॉट एअर बलून चे सहसंशोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचे निधन.*

*१९४३: कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिकविजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १८६८)*

*१९६१: प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार गोविंद शास्त्री दुगवेकर यांचे निधन.*

*१९८०: पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन.*

*२००१: वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार (जन्म: २५ मार्च १९३२)*

*२००४: यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता (जन्म: ६ सप्टेंबर १९२९)*

*२००५: एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (जन्म: १८ मार्च १९४८)*

*२००८: जनरल माणेकशाॅ यांचे निधन.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/मुख्य सहप्रशासक🙏*
*✍श्री अशोक लांडगे*
95273 98365
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles