९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मराठी साहित्य विश्वातील अतिशय महत्वाचे व्यासपीठ समजल्या जाणा- या यंदाच्या ९७ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरकर कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असताना डॉ. शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शोभणे हे कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने शनिवारी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यामध्ये राज्यातून आलेल्या नावांवर चर्चा करण्यात आली. या नावांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे आणि जेष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर यांचा समावेश होता. संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया न राबवता आता साहित्य महामंडळाकडून संमेलनाध्यक्षाची थेट निवड केली जाते. त्यानुसार यंदा शोभणे यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे या आज पुण्यात साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन डॉ. शोभणे यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. शोभणे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये उत्तरायण साठी महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) चा पुरस्कार, उत्तरायण साठी मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार, उत्तरायण साठी विदर्भ साहित्य संघाचा पु.ल. देशपांडे कादंबरी पुरस्कार, तसेच मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर च्या वतीने २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे डॉ रवींद्र शोभणे हे अध्यक्ष होते. शिवाय सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. आज मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष संस्थापक राहुल पाटील यांनी डॉ रवींद्र शोभणे यांचे भ्रमणध्वनीवरून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles