सल वेदनेची

सल वेदनेची



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रात्रीच्या अंधार गर्भातून
अंकुरणारे जहरीले फुत्कार
विष ओकू लागतात तेव्हा
बहरत जातो विषवृक्ष….
भिडतो तनमनाच्या आकाशपटलावर
निरभ्र आकाश व्यापत….
ढगांच्या पुंजक्यातून मग
धो धो बरसतो विषेला पाऊस
उद्रेक भावनांचा महापूरात वाहतांना
हाहाकार माजतो सर्वत्र….
आर्त किंकाळ्याने
हादरुन गेलेली जिंदगी
ओसरलेल्या पुरानंतरही
वेदनेच्या अमिट ओल्या जखमा
असह्य करतात जगणं…
मरत यातनांचा प्रवासात
कोणाचीच नसते साथ
केव्हाच सरलेली असते रात
तरीही उगवतीचा सेर्य आज
दडी मारून अंबरात
सूर्यादयापूर्वीच सूर्यास्त करून…

अरविंद उरकुडे
गडचिरोली
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles