
पांडुरंग
विठू माऊली सावळी
थोर पंढरीची माय
नाम तुझे पांडुरंगा
घेती भक्त समुदाय
तुझ्या रुपात अवघे
भावविश्व सामावले
तुज पाहता विठ्ठला
मन माझे सुखावले
मुखी नाम पांडुरंग
घेता पवित्र पावन
लाभे आनंद सकला
होई समाधान मन
सखा पांडुरंग माझा
असे भुकेला भक्तीचा
संत सज्जनाचा वाली
मार्ग दावितो मुक्तीचा
दत्ता काजळे
तुरोरी ता.उमरगा
======