
ढगाळ आकाश
ढगाळ आकाश जणू,
घुसमट असते मनाची
सांगताही येत नाही पण,
सोबत राहते आयुष्यभराची
कोंदटलेल जग आपल्यातच,
जगणं तीळ तीळ कण कण
वाट बघत बसतं कधीतरी,
मोकळं होईल हे वेडं मन
भरून येतं एकांतात काळ्या
ढगांची दाटी वाटी चालते
अंतर्मनातही अशीच विचारांची,
गर्दी कुठूनतरी येऊन जमते
कुठेतरी हळूच बरसतं आकाश
कुठेतरी अगदी गच्च भरत जातं
मनाचही असच आहे ना नको,
तिथे बरसत,नको तिथे गप्प रहातं
बांध फुटला की मग तणमन सगळं,
भरभरून जीवाच्या आकांताने रडतं
ढगाळलेलं आकाशही अनावर
झालं की वादळा सारखं फाटतं
एकांतात झिरपण्याची आकाशाला ही
आता चांगलीच सवय झाली आहे
रात्रीच्या अंधारात दिसत नाही कोणाला,
डोळेही आसवे गाळायला शिकली आहेत.
सविता वामन, ठाणे.