
पॅराडाईज इंग्लिश स्कूलच्या लिटील स्टारची नवोदय भरारी
तारका रुखमोडे, गोंदिया प्रतिनिधी
गोंदिया: एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये पॅराडाईज इंग्लिश स्कूल सौंदड येथील हिमांशी सत्यजित राऊत, आर्यन नरेश गहाणे, श्रुती मारुती दिपेवाड व खुशी निकेश कापगते या चार विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
संस्थापक संतोष राऊत व त्यांच्या पत्नी मुख्याध्यापिका राजश्री राऊत या उभयतांच्या विशेष मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही गगनभरारी घेतलेली आहे, त्यामुळे पालकांनी त्यांचे विशेष आभार मानले.
या शाळेचे आणखी एक विशेष म्हणजे जानेवारी 2023 मध्ये झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांची निवड झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे सारे श्रेय स्कूलचे संस्थापक संतोष राऊत मुख्याध्यापिका राजश्री बडोले, विजय कोचे व सर्व शिक्षकवृंद तसेच आपल्या आई-वडिलांना सुद्धा दिले आहे . विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून शाळेत विशेष वर्गांचे तथा मार्गदर्शनीय अभ्यासक्रमाचे आयोजन केले जाते.
शाळेचे संस्थापक संतोष राऊत यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसवे बोलावून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा समयोचित सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांच्या सुयशासाठी व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या .सर्व पालकांनी संतोष राऊत यांचे आभार मानले.याप्रसंगी सर्व लिटील स्टार्सच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.