
वसंत नगर पोलीस स्टेशनच्या आवारातच युवकाकडून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
_पत्नीच्या त्रासाला कंटाळून केले विष प्राशन_
तालुका प्रतिनिधी,पुसद
पुसद: वसंतनगर पोलीस स्टेशनच्या आवारात पुसद तालुक्यातील सांडवा-मांडवाच्या देव तांडा येथील राहणाऱ्या युवकाने दि.२५ जून २०२३ रोजीच्या सकाळी ११.१५ वाजताच्या दरम्यान पत्नीच्या त्रासाळा कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्महत्या करणाऱ्या युवकाविरोधात वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये दि.२५ जून २०२३ रोजीच्या ३.२२ वाजता विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वसंत नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक कॉन्स्टेबल रमेश रा. इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून देव तांडा येथे राहणाऱ्या बादल देवसिंग चव्हाण वय ३२ वर्षे याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.वसंत नगर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बादलने वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये नानी,सासु व त्याच्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून जोर जोराने ओरडत होता.त्यानंतर त्याने त्याच्या खिशातून विषारी औषधाची बाटली काढून पोलीस स्टाफ समोरच ११.१५ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.
याप्रकारामुळे एकच खळबळजनक घटना घडली आहे.युवक हा आरडाओरड करून त्याची नानी, सासू,त्याच्या बायकोला सोबत त्याच्या घरी पाठवत नाही व बायको सुद्धा त्याच्यासोबत घरी यायला तयार नाही असे आरडाओरडा करत असताना अचानकपणे त्यांनी त्याच्या खिशातून विषाच्या औषधाची बॉटल काढून विष प्राशन केले.पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना काही कळण्याच्या आतच सदरील घटना घडल्यामुळे खळबळ उडाली.तात्काळ युवकाला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.प्रकरणाचा अधिक तपास वसंत नगर पोलीस करीत आहे.