बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९२ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*दुनिया पैशाची*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

हव्यास माजलाय चहुबाजूंनी
कोणास नाही बांधिलकी कोणाची….
स्वार्थासाठी नाती ही विसरतील
ऐसी मतलबी दुनिया पैशाची….

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव-रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️📘🌸📘♾️♾️♾️♾️
*दुनिया पैशाची*

दुनिया पैशाची
म्हणती सारे जण
स्वत: तर झाकून बघ
या जगरहाटीचेच आपण कण.

*सौ. मनिषा आष्टनकर*
नेरी चिमूर चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📘🌸📘♾️♾️♾️♾️
*दुनिया पैशाची*

*ही दुनिया पैशाची*
*इथे गुणांची कदर कमी*॥
*जितका जो तालेवार*
*तितकी प्रशंसेची हमी*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📘🌸📘♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*दुनिया पैशाची*

दुनिया हि पैशाची
जो तो आता धावतोय
आपलं कोण परकं कोण
खरी माणुसकी विसरतोय

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर .पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📘🌸📘♾️♾️♾️♾️
*चारोळी–दुनिया पैशाची*

झगमगती दुनिया पैशाची चंदेरी
इथे सारेच असती तुपाशी
काबाडकष्ट करणारे गावखेड्यात
असतात अर्धपोटी उपाशी.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️📘🌸📘♾️♾️♾️♾️
*दुनिया पैशाची*

दुनिया पैशाची इथे
पैसा सर्वस्व मानतात
दाम करी काम इथे
भ्रष्टाचार वाढवतात

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📘🌸📘♾️♾️♾️♾️
*दुनिया पैशाची*

अजब-गजब ही दुनिया पैशाची
इथे ना राहिली किंमत कोणाची
नाती-मान-मर्यादा फक्त नावासाठी
सारे काही चालले फक्त पैशासाठी

*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles