धाडसी तरूणाच्या पाठीवर शाबासकीची थाप

धाडसी तरूणाच्या पाठीवर शाबासकीची थाप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_पेशव्यांच्या वंशजांनी केला सत्कार_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे: पुण्यात नुकताच सदाशिव पेठेत तरुणीवर झालेला कोयता हल्ला सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असून या खळबजनक घटनेने पुण्याची संस्कृती, शांतता आणि सुरक्षितता यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या घटनेचे अनेक पैलु आता समोर येत आहेत. भर वस्तीत, एवढ्या गर्दीच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात दोन तरूणांनी जिवावर उदार होऊन पिडीत तरूणींचे प्राण वाचवले. कोयताधारी तरुणाला पकडण्यासाठी धैर्याने या घटनेतील संतप्त आरोपीचे वार झेलून तरुणीचे प्राण वाचवणा-या अशा या तरूणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

असेच कौतुक आणि शाबासकी देण्यासाठी पेशव्यांचे वंशज डाॅ.वि.वि. तथा उदयसिंह पेशवे यांनी नुकताच या तरूणांचा सत्कार आयोजित केला होता. सारसबाग मंदिर येथे उदयसिंह पेशवे यांच्या हस्ते पुणेरी पगडी, पेशवाई शेला, गणेश प्रतिमा, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हर्षद पाटील याचा सत्कार करण्यात आला. काही कारणास्तव लेशपाल जवळगे उपस्थित राहू शकला नाही.

याप्रसंगी श्रीदेवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त, श्री. रमेश भागवत, इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत, सीए सुधीर पंडित, विश्वेश्वर सहकारी बँकेच्या संचालिका सुलभा कोकाटे आणि सामाजिक कार्यकर्ते मधुकर राऊत उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles