गुरुवारीय चित्रचारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९२ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पोलखोल*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विकास कामाचा निधी घेऊन
उत्कृष्ट कामाचा डंका पिटवला
निकृष्ट कामाची केली पोलखोल
पहिल्याच पावसाने इंगा दाखवला

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪸💚🪸♾️♾️♾️♾️
*पोलखोल*

भ्रष्टाचाराचा कळस गाठून
व्यवहारात करतात झोल
निकृष्ट बांधकाम कोसळते क्षणात
भ्रष्टाचाराची मग होते पोलखोल.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🪸💚🪸♾️♾️♾️♾️
*पोलखोल*

वाहून गेलं छप्पर सार
उघड्या पडल्या भिंती
एका पावसात पोलखोल
यंत्रणेची गहाण पडली निती

*सौ.शशी मदनकर ,ब्रम्हपुरी*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪸💚🪸♾️♾️♾️♾️
*पोलखोल*

कंत्राटदाराच्या घरी
सोन्याच्या विटा
पोलखोल करतो
हा राखेचा साठा

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪸💚🪸♾️♾️♾️♾️
*पोलखोल*

*पुन्हा तुंबली राजधानी मुंबई*
*उघडा पडला सगळा झोल*
*जगासमोर नाचक्की झाली*
*प्रशासनाची झाली पोलखोल*….

*सौ. विद्या निनावे*
*नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🪸💚🪸♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका) सन्मानपत्र संध्यासमयी नंतर देण्यात येईल*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*पोलखोल*

पहिला पाऊस खड्डे पाडतो
खड्डे बुजवून पळ काढतो
निर्दोशांचे अपघात घडवितो
ठेकेदाराची पोलखोल करतो

*श्रीमती कमल दवंडे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪸💚🪸♾️♾️♾️♾️
*पोलखोल*

स्वस्वार्थासाठी तू
करतेस सा-यांची दिशाभूल
जेव्हा पोलखोल उघडकीस आल्यावर
सा-यांच्या नजरेतून तू गिरशील

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪸💚🪸♾️♾️♾️♾️
*पोलखोल*

कामात असावी प्रामाणिकता
नसावी तिथे दिशाभूल
आले रयतेच्या ध्यानात तर
होती मग पोलखोल

*बी. आर. पतंगे (बीके )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪸💚🪸♾️♾️♾️♾️
*पोलखोल*

निकृष्ट दर्जाचे बांधकाम
असती फक्त मोठे बोल
पडझड सुरू होता अशी
सर्वांसमोर होई पोलखोल

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️🪸💚🪸♾️♾️♾️♾️
*पोलखोल*

करोडोंच्या रुपयांची निविदा
केवळ कागदावर डामडौल
बांधकामाचा निकृष्ट दर्जाच
करते व्यवस्थेचे पोलखोल…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles