आजचे दिनविशेष;दिनांक: ३० जून २०२३: शुक्रवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔴 आजचे दिनविशेष🔴*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📘दिनांक: ३० जून २०२३: शुक्रवार📘*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*महत्वाच्या घटना*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

१८५९: चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला.

१९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.

१९४४: मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री हा चित्रपट रिलीज झाला.

१९६०: काँगोला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९६५: भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.

१९६६: कोकासुब्बा राव भारताचे वे सरन्यायाधीश झाले.

१९६६: अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.

१९७१: सोयुझ-११या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.

१९७८: अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.

१९८६: केंद्रसरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.

१९९७: ब्रिटनने चीन कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.

२००२: ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.

*जन्म / जयंती*

१४७०: फ्रान्सचा राजा चार्ल्स-आठवा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १४९८)

१९१९: हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म: (मृत्यू: २७ मे २००७)

१९२८: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)

१९३४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म.

१९४३: दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म.

१९५४: डॉमिनिकाचे पंतप्रधान पिएर चार्ल्स यांचा जन्म.

१९५९: भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म.

१९६६: अमेरिकन मुष्टीयोद्धा माइक टायसन यांचा जन्म.

१९६९: श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनत जयसूर्या यांचा जन्म.

१९७३: भारतीय क्रिकेट खेळाडू दोड्डा गणेश यांचा जन्म.

*मृत्यू / पुण्यतिथी*

१९१७: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)

१९१९: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉनविल्यम स्टूट रॅले यांचे निधन.

१९९२: साहित्यिक, वक्ते समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन.

१९९४: नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)

१९९७: शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन.

१९९९: मराठी काव्यसृष्टीतील कवी कृष्णाबळवंत तथा कृ. ब. निकुंब यांचे निधन.

२००७: दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे निधन. ( जन्म: १५ मार्च १९४३)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/मुख्य सहप्रशासक🙏*
*✍श्री अशोक लांडगे*
95273 98365
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles