
जि प प्रा शा मांडवा येथे वंदनाताई बावणे यांच्या हस्ते गणवेश व पुस्तक वाटप
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पं स वर्धा मधीलच जि उ प्रा शाळा मांडवा येथे शाळा प्रवेशउत्सव वं शालेय गणवेश वं पुस्तक वाटप जि प सदस्या वंदनाताई बावणे यांच्या हस्ते गणवेश व पुस्तक वाटप आज ३० जून रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय नेहारे, तर प्रमुख पाहुणे सरपंच तथा मांडवा गावचे प्रथम नागरिक सचिन उईके, मुख्याध्यपिका सुनीता वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सुनील आत्राम, शिक्षक विजय लोहकरे, संजय वैरागडे, दिनेश कातोरे प्रमुख पाहुणे होते. विद्यार्थाचा बौद्धिक, शारीरिक वं मानसिक विकास हा पुस्तकाच्या माध्यमातूनच होत असतो वं माणूस घडत असतो असें मत अध्यक्ष यांनी व्यक्त केलं तर प्रमुख पाहुणे सरपंच सचिन उईके यांनी मुलींनी नियमित अभ्यास केल्यास अनेक आव्हान पेलण्याचे सामर्थ्य निर्माण होते असें मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रमोद मुरार यांनी केले. तर आभार विजय लोहकरे यांनी मांडले. या प्रसंगी विद्यार्थना शालेय गणवेश, पुस्तके व वर्ग पहिलीच्या विद्यार्थचा पुष्प गुच्छ देऊन शाळाप्रवेश उत्सव साजरा झाला.