चंद्रशेखर आझाद यांच्यावरील गोळीबाराच्या निषेधार्थ मा.राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत निवेदन

चंद्रशेखर आझाद यांच्यावरील गोळीबाराच्या निषेधार्थ मा.राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत निवेदनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_भीम आर्मी व विविध सामाजिक संघटना,राजकीय पक्ष, पत्रकार संघटना, सामाजिक संस्था, संविधानप्रेमी यांचा सहभाग.!_

पुसद शहर व तालुका प्रतिनिधी

पुसद: भीम आर्मी संस्थापक तथा आजाद समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद (रावण) हे उत्तर प्रदेशातील सहारनपुर जिल्ह्यातील देवबंद या ठिकाणी ते घरगुती कार्यक्रमाकरिता कारने जात होते तेव्हा काही मनुवादी विचारसरणीच्या जातीयवादी गुडांनी त्यांच्या कारवार गोळीबार केला,यामध्ये एक गोळी कारच्या दरवाजातून आरपार जाऊन त्यांच्या कमरेजवळ लागली त्यात ते जखमी झाले.

सदरचा हल्ला हा सुनियोजित कट असून यापूर्वीही त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.त्यातून ते सुखरुप बचावले. भाई चंद्रशेखर आजाद यांना सुरक्षा सुरक्षा देण्यात यावी याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे,परंतु इथल्या बीजेपी सरकारने याबाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे जे कोणी हल्लेखोर आहे त्या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून या मागील मास्टरमाईंड कोण आहे याचा शोध घ्यावा तसेच भाई चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी अन्यथा भीम आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने संपूर्ण भारत बंद करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात येत आहे.

या निवेदन देते वेळेस भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, देवेंद्र खडसे मा.प.स.सदस्य,किशोर कांबळे जिल्हाध्यक्ष भिम टायगर सेना, बुद्धरत्न भालेराव तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, पत्रकार बाबाराव उबाळे ,राजेश ढोले , जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, लक्ष्मण कांबळे शहराध्यक्ष आरपीआय आठवले गट, भारत कांबळे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, प्रसाद खंदारे शहर महासचिव वंचित बहुजन आघाडी, गोपाल जगताप शहराध्यक्ष आजाद समाज पार्टी,अजय लोखंडे शहराध्यक्ष भीम आर्मी, पत्रकार कैलास श्रावणे,विजय निखाते , पत्रकार प्रकाश खिलारे, दिनेश खांडेकर,अंबादास वानखेडे, नितेश खंदारे,नितीन सरोदे , भैय्यासाहेब मनवर, यशवंत पठाडे, माणिक जाधव,ओमप्रकाश गवई, दत्ता कांबळे,अरुण राऊत,राजरत्न लोखंडे, किसन सरकुंडे,आशाताई टाळीकोटे,चंद्रकला टाळीकोटे, दीपक कांबळे,अक्की चौरे,रमेश बेद्रे,गणेश भगत इत्यादी सामाजिक कार्यकर्ते व संविधानप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles