धोंड्या..

धोंड्या



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

धोंड्या,दगड्या माणसाची अशी नावं
माणसांपेक्षा रे धोंड्याला का देता भाव ?
धोंड्या म्हणून ‘ढ’ ठरवले का आम्हा बरं ?
हरिजन म्हणून मीठ चोळलंय जखमेवर

चिखलातील ऐरावत बाहेर रे आलाय
ज्ञानज्योत रे पेटवून सज्ञान झालाय
बंद करा दुकानदारी जातीच्या नावानं
जागलोय झोपेतून धोंड्याच्या घावानं

भुकेला कोंडा निजेला धोंडा संपली गत
शिक्षणानं वाढवली आम्हीच आमची पत
बन तूच शिल्पकार सांगितलं बाबानं कसं
ज्ञानसूर्य भीमामुळं बदलली आमची दिसं

ज्ञानसागरा त्रिवार मुजरा तुझ्या कर्तत्वाला
जगामध्ये तोड नाही भीमाच्या दातृत्वाला
शिका,संघटित व्हा,संघर्ष करा प्रगतीचे रे तंत्र
वाघ होऊन जगण्याचा भीमानं दिलाय रे मंत्र

वाघ होऊन जगण्याचा भीमानं दिलाय रे मंत्र

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
सहसंपादक, सहप्रशासक/परीक्षक/संकलक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles