‘शिक्षक’ समाजाचा आदर्श शिल्पकार..

“शिक्षक’ समाजाचा आदर्श शिल्पकार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शिक्षक या शब्दाचा अर्थ शि-शिलवान, क्ष-क्षमाशील, क-कर्तव्यनिष्ठ असा अर्थ होतो. शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षकाचेच पाहून कृती करतात.ते घरी जाऊन पालकांना सांगत असतात.म्हणून शिक्षक व समाज ऋणाणूबंध धागा आहे.एक नैतिक जबाबदारी आहे.जेवढी पालकांची जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी शिक्षकांची आहे.गुरचा असावा ध्यास मग यश मिळेल हमखास. शिक्षक हा कामगार नाही तर तो शिल्पकार आहे,एक कलावंत आहे,एक पालकत्वाची जबाबदारी तो पेलत असतो.आपला विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला की,जेवढा आनंद पालकांना वाटतो तेवढाच आनंद शिक्षकांना होतो.
विद्यार्थी, पालक, समाज यांचे अतूट नाते आहे. आजच्या विद्यार्थ्यांना उद्याच्या जीवनाला सामोरे जाण्यासाठी शिक्षक तयार करतात. क्षमता विद्यार्थ्यांमध्ये उपजत असतात. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या अंगभूत गुणांचा विकास होतो.शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थीच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.म्हणून काही विद्यार्थी आपले ध्येय पुर्ण होईपर्यंत प्रयत्न करत असतात.परवा एप्रिल 2023 मध्ये पोलिस भरती मध्ये एक गरीब कुटुंबात जन्मलेली मुलगी सातव्या वर्षी पोलिस भरती स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.

‘गुरु-शिष्यांच्ये पवित्र बंधन म्हणजे आई – वडिलांसारखे नाते असते.भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्यांची परंपरा पुरातन काळापासून चालत आली आहे. ‘व्यास पौर्णिमेला’ आपण आपल्या आध्यात्मिक गुरुंना वंदन करतो. ‘जागतिक’ शिक्षक दिन 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. जगभर शिक्षक दिन वेगवेगळ देशात वेगवेगळ तारखांना पाळले जातात.

जसे, अफगाणिस्तानात 24 मे, अर्जेंटिना 11 सप्टेंबर, भूतान 2 मे, ब्राझील 15 ऑक्टोबर, चीन 10 सप्टेंबर आणि भारतात 5 सप्टेंबर! भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मे, 1962 ला राष्ट्रपतिपदाची सूत्रे हाती घेतली. तत्पूर्वी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. ते एक ‘उत्कृष्ट शिक्षक’ होते. आपल्या अंगभूत गुणांमुळे व व्यासंगी वृत्तीमुळे भारतभर व भारताबाहेर आदर्शाबाबत विख्यात असणार्‍या भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन (5 सप्टेंबर) सर्वत्र ‘शिक्षक-दिन’ म्हणून साजरा होतो. शिक्षकांनी किती व्यासंगी असावे याचा आदर्श ‘वस्तुपाठ’ त्यांनी आपल्या समोर ठेवला. तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात वाढला. परंतु तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. त्या शिक्षकांचे स्थान काल, आज, उद्या समाजात व देशात अढळ राहील.

शिक्षकासह समाजातल्या सर्व घटकांनी त्यांना व त्यांच्या कार्याला ‘विस्मृत’ करायचे नाही. त्यांच्या गुणांचा आपल्या जीवनात अंगीकार केला पाहिजे. सर्व शिक्षक-प्राध्यापकांचे आदर्श, भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार, जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, मानवतावादी विचारवंत, सिद्धहस्त लेखक, श्रोत्याना मंत्रमुग्ध करणारे कुशल वक्ते, राजकारण, समाजकारण व धर्मकारण यांचे समन्वयक, भारताची प्रतिमा विदेशात उंचावणारे थोर तत्त्वचिंतक अशा विविधांगी व्यक्मित्वाचे धनी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आम्हा शिक्षकांसमोर उत्तुंग प्रेरणादायी आदर्श व्यक्मित्व आहे.

वर्तमान काळात ‘शिक्षक’ हे केवळ अध्यापनकर्ता न राहता ते ‘मार्गदर्शक’, समुपदेशक पालकदेखील आहेत. शिक्षकांचे व्यक्तिमत्व जितके विनयशील, संपन्न, व्यासंगी तितका परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर व विद्यार्थ्यांना मिळणार्‍या प्रेरणेवर होत असतो म्हणून तत्त्वज्ञान कितीही बदलले अध्ययन, अध्यापनाच्या प्रक्रियेत बदल झाला तरी संस्कारक्षम शिक्षकांचे महत्त्व कमी होणार नाही. आपला ‘पाल्य’ यशस्वी झाल्यावर शिक्षकांना त्याचे श्रेय देण्यास तो तयार आहे. आधुनिक युगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञान-निष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान, सहकार्य, समाजाभिमुखता, साहस या गुणांनी युक्त व्यक्तिमत्तवाची नितांत आवश्यकता देशाला व समाजाला आहे.अशी व्यक्तिमत्वे घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे.

आज शिक्षकापेक्षा विद्यार्थांना इंटरनेट वर भरपूर माहिती उपलब्ध आहे.माहिती देण्यासाठी सुसज्ज वाचनालयापासून ते माहिती महाजालापर्यंत अनेक साधने आज सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहेत. त्या साधनांची योग्य ती ‘दिशा’ त्यांना खुली करून द्यावी लागेल. विद्यार्थी त्यामुळे भटकणार नाही. ‘माहिती-व्यवस्थापन’ करत ‘कुतूहल’ व ‘जिज्ञासा’ जागृत करण्याचे काम शिक्षक करतात. झपाट्याने बदलणार्‍या काळात सतत शिक्षक सुध्दा ज्ञान देण्यासाठी आद्यवत आहेत. शिक्षक सुद्धा अपडेट ज्ञानासाठी प्रयत्न करत आहेत. काळाची नवीन आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी दोघांनाही आता स्वतःला परस्परपूरक व समर्थ केलेच पाहिजे. शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण, जीवघेणी स्पर्धा, उदासीनता अशा अत्यंत विचित्र परिस्थितीत शिक्षक, विद्यार्थी पालक यांनी एकत्रितपणे विचार करून आपल्या पाल्याला सोबत घेऊन आधार दिले पाहिजे.तरच आपला पाल्य वाईट मार्गला जाणार नाही.अशी ईश्वर चरणी प्रार्थना करु.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा, जि उस्मानाबाद
===========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles