
संपादक मा. राहुल सरांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन….!
वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर
वाढदिवसाच्या या शुभदिनी गाथा वर्णावी किती सेनापतींची…मागणे हेचि देवा खात्री द्यावी उत्तम आरोग्य आणि यशाची….!
११० मराठीचे शिलेदार शैक्षणिक समूह, तब्बल १८ मराठीचे शिलेदार कविता, चारोळी, हायकू आणि काव्यत्रिवेणी समूह, साप्ताहिक साहित्यगंध या सर्व माध्यमातून साहित्यिक घडवून त्यांना मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर या संस्थेमार्फत असंख्य कवींचे कविता चारोळी संग्रहाचे स्वप्न सत्यात उतरवणारे, बिनधास्त न्यूज चॅनलद्वारे शिलेदारांचे साहित्य प्रकाशित करणारे, राज्यच नव्हे तर देशविदेशातील समाजमाध्यमातून ( Social Media) मराठी भाषेतील सकस साहित्य लोकांपर्यंत पोहचवणारे, त्याचबरोबर वेळोवेळी ‘दिवाळी अंक’, जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन विशेषांक’ वेगवेगळ्या प्रांतात साहित्य संमेलन, कविसंमेलन यांसारखे उपक्रम राबवून तेथील स्थानिक लोकांना तसेच इतरही जिल्ह्यातील साहित्यिकांना मंच उपलब्ध करून देणारे आमच्या मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साप्ताहिक साहित्यगंधचे मुख्य संपादक माननीय राहुलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आपणांस उत्तम आरोग्य आणि आपल्या कार्यक्षेत्रात उत्तुंग यश लाभावे हीच मनोकामना…!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह
दि. ०६/०६/२०२३