
जागतिकीकरणाच्या युगात
जागतिकीकरणाच्या युगात
जग जवळ आले,पण माणसे दुरावले
जागतिकीकरणाच्या युगात…….
शेतकरी झाले त्रस्त
पण बिल्डर झाले मस्त
परकीय कंपन्यांनी भारताचा
पैसा केला फस्त
जागतिकीकरणाच्या युगात……
एकीकडे प्रचंड धनसंपत्ती
संपदा आणि प्रगती
पण दुसरीकडे द्रारिद्रय आणि विपत्ती
मुक्त बाजारपेठेमुळे सर्वत्र आली आपत्ती
जागतिकीकरणाच्या युगात……
पाश्चात्यांचे भारतीय करतात अनुकरन
‘व्हॅलेन्टाईन डे आणि विविध ‘फॅशन ‘
आधुनिककरणाच्या नावाखाली झाले
संस्कृतीचे विकृतीकरण…….
जागतिकीकरणाच्या युगात…..
जग आले जवळ ,पण माणसे दुरावले
डॉ,प्रा.कल्पना सांगोडे, नंदेश्वर
अर्जुनी/मोर.गोंदिया
सदस्या मराठीचे शिलेदार समूह