
देवापुढेच दारुच्या बाटल्यांचा खच; मस्त चाललंय यांचं..,!!!
नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात अवैध धंद्याला ऊत येणे नवे राहिले नाही. परंतु ग्रामीण भागातही अनेक धंदे हे अवैधरित्या चालत आहेत. लहान सहान तक्रारीवर छोटी मोठी कारवाई दिखाव्यापुरती होत असून नंतर मात्र जैसे थे ‘सुव्यवस्थित’ हा कारभार सर्रासपणे सुरु असल्याचे चित्र दिसून येते.
हिंगणा तालुक्यातील मौजा वानाडोंगरी अंतर्गत येत असलेल्या हिंगणा ते गोंडखैरी या मार्गावर अगदी रिंगरोड लगतच ‘देवा’चे बिअर बार व हॉटेल सुरू आहे. आपण पाहात असलेल्या चित्रफितीत इमारतवजा दुकान भव्य असून, यास परवानगी कशी देण्यात आली हा प्रश्न नक्कीच पडेल. यात अगदी आवारात देवाचे मंदिर असून त्यापुढ्यातच भरगच्च असा दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. यावरून असे वाटते की, ‘दवा व दारु’ एकदाच एकाच ठिकाणी असा बेत आखलेला असावा. मध्यंतरी वानाडोंगरी येथील नागरिकांनी यास विरोध दर्शविला होता. परंतु विरोधाभासाचे हे प्रकरण गुलदस्त्यात असल्याचे बोलले जाते. एकंदरीत बघता ‘आपल्या अजब गजब सरकारमध्ये, मस्त चाललंय यांचही’ असे म्हणायला हरकत नाही.
परंतु हे जर अवैध असल्यास यावर अंकुश लावणे पोलीस प्रशासनाचे काम असून याकडे रितसर कानाडोळा करताहेत आणि अशाना अभय देत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.