
ऑलम्पिक विजेत्यांना न्याय मिळावा : प्रा. विजय बारसे
संविधान चौकात खेळाडूंच्या समर्थनार्थ आंदोलन: यशंवत तेलंग
नागपूर :दिल्लीच्या जंतर मंतर येथे महिनाभरावर आंदोलन करीत असलेले ऑलंपिक विजेता कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ नागपुरातील क्रीडा प्रेमींनी आंदोलन करीत लक्ष वेधले. सविधान चौक येथे झालेल्या या आंदोलनात देशातील मुलींचा अवमान हा भारतीय संविधान व लोकशाहीचा अपमान असल्याचे म्हटले आहे. आंदोलनापूर्वी ओरिसातील रेल्वे भारतातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मला अर्पण करण्यात आले. प्रा. विजय बारशे संयोजक यशवंत तेलंग आणि योगेश ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या खेळाडूंच्या प्रयत्नाने देशाने ऑलम्पिक मध्ये मेडल मिळविले देशांचा गौरव वाढविला. अशा खेळाडूंचे लैंगिक शोषण होने गंभीर बाब आहे. याप्रकरणी दोषी भाजपच्या खासदाराला अटक करून खेळाडूंचा सन्मान वाढवावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलन यशस्वीरित्या साजी वर्गीस केरळ, स्टीफन भाई वर्धा,माजी नगरसेवक तन्वीर अहमद, निलेश ढोके सौसंर, बादल सरोदे, शिबा मॅडम, अनुपमा तेलंग, सुरेश धमगाये, पंकज महाजन, प्रिती दहीकर, सम्यक तेलंग, अरविंद मेश्राम, नितीन वासनिक, उमेश देशमुख, विकास मेश्राम, शिवानी, विक्की, जुनेद अली यांच्यासह अनेकांनी यावेळी निषेध व्यक्त केला. आंदोलनाचे संचालन व आभार यशवंत तेलंग यांनी मानले.