सरस्वती नगरात घरीच केली वटवृक्षांची पूजा

सरस्वती नगरात घरीच केली वटवृक्षांची पूजा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दक्षिण नागपुरातील महिलांनी घेतला स्क्रीय सहभाग

नागपूर: सौभाग्यवती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हिंदू पंचांगानुसार जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी व्रत करतात. वटसावित्री च्यानिमित्ताने स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यावेळी शहराच्या विविध भागात लावलेल्या वटवृक्षांची पूजा करतांना सौभाग्यवती जागोजागी दिसून आल्या.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सौभाग्यवती नटून आणि रंगीबेरंगी साड्या नेसून भर दुपारी वटवृक्षाजवळ पूजेचे ताट घेऊन अनवाणी पायाने पोहोचल्या.
सरस्वतीनगरात छोट्या वटवृक्षाची पूजा करून वटसावित्री हा सण साजरा केला. त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. पुजा करतेवेळी अनुसया चौधरी, संगीताताई वराडे, प्रतिभाताई प्रधान व भावनाताई पराडकर यांनी सरस्वतीनगर येथील रहिवाशी उखंडराव चौधरी यांच्या घरातील वटवृक्षाची मनोभावाने पूजा केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles