
संजय व सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी
सकाळचे भोंगे बंद करा अन्यथा.,???
मुंबई: संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुनील राऊतांच्या फोनवर धमकीचा फोन आल्याची माहिती मिळते आहे. यावर सुनील राऊत म्हणाले की, काल मला 3 – 4 वेळा धमकीचे कॉल आले. धमकीचा जो कॉल आलाय हे वरिष्ठांपर्यंत पोहचवण्यात आले आहे. असे वारंवार धमक्याचे कॉल आम्हाला येत असतात. मात्र सरकार यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. सरकारच्या विरोधात संजय राऊत बोलतात. सरकारने हे प्रकरणं केलं असावं. असा मला डाउट आहे. सरकारने आम्हाला कोणतेही संरक्षण दिलं नाही आहे. असे सुनिल राऊत म्हणाले.