
गुजरात उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांनी वकिलाला कोर्टातच स्त्रीवरील मनुस्मृती वाचण्यास सांगितले
राजकोट: १४ – १५ वर्षांच्या मुलींचे लग्न होत असे त्या १७ वर्षामध्ये आई होत असे. मुलींचे लग्न लवकर करून १७ वर्षांच्या असतांना लग्न होण्याच्या घटना सामान्य होत्या. अशी महत्वाची टिप्पणी गुजरात हायकोर्टाने एका प्रकरणाची सुनावणी करताना केली आहे. ही केस एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर गर्भधारणा आणि गर्भपात (MTP कायदा) संबंधित होती.
दरम्यान, बलात्कार पीडितेने गर्भपाताच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायाधीशांनी वकिलाला या संदर्भात स्त्रीवरील मनुस्मृती वाचण्यास सांगितले. कोर्टात मनुस्मृतीचे वाचन करण्यात आले. न्यायमूर्तींनी राजकोट सिव्हिल हॉस्पिटलकडून अल्पवयीन आणि गर्भाची प्रकृती लक्षात घेऊन पीडितेच्या सात महिन्यांच्या गर्भाचा गर्भपात करणे योग्य आहे का, याबाबत वैद्यकीय मत मागवले आहे.
या प्रकरणातील बलात्कार पीडितेच्या वक्तव्याची न्यायमूर्तींनी दखल घेतली आणि राजकोट रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुखांचा सल्ला घेतला. यानंतर न्यायमूर्ती समीर दवे यांनी पीडितेची मानसिक स्थिती तपासण्यासाठी ऑर्थोपेडिक तपासणी आणि मानसिक तपासणी करण्याचे आदेश दिले.
कोर्टाने अल्पवयीन मुलीची स्थिती जाणून घेतली असून कोर्टाने गर्भपाताचा आदेश दिल्यास तिचा गर्भपात करणे योग्य आहे का, याबाबत मत मागवले आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी 15 जून रोजी निश्चित केली आहे. पीडितेच्या प्रसूतीची तारीख 16 ऑगस्ट आहे. कोर्टाने राजकोट सरकारी रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता यांना हे निर्देशही दिले आहेत, की मुलीची चाचणी तातडीने डॉक्टरांच्या एका पॅनलकडून करण्यात यावी त्यांचा अहवाल काय असेल त्यावर आम्ही गर्भपाताची संमती द्यायची की नाही ते ठरवू. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे.