
समृद्धी पॅनलच्या स्नेह मिलन सोहळ्यात पंधराही उमेदवाराची जल्लोषपूर्ण उपस्थिती
_नागपूर टीमने केलेल्या आयोजनाचे सर्वत्र कौतुक_
राहुल पाटील, नागपूर
नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या संत्रानगरीत नागपूर शहरातील शिक्षक टीमने संत गजानन महाराज मंदीर, मानेवाडा येथे अभूतपूर्व व अविस्मरणीय अशा स्नेहमिलन समारंभाचे दि १० जून २०२३ रोजी प्रंचड उत्साहात आयोजन केले. वर्धा जि.प. एम्पलॉईज (अर्बन) को- आॉप. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक दि २५ जून २०२३ रोजी होणार असून या संचालक पदासाठी समृद्धी पॅनलचे पंधराही उमेदवार प्रचार दौ-यासाठी नागपुरात जल्लोषपूर्ण वातावरणात उपस्थित होते.
एकूण दहा विविध संघटनाची युती असलेल्या समृद्धी पॅनलमध्ये पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून या सर्वांचे भवितव्य दि २५ जून रोजी मतपेटीत बंद होणार आहे. समृद्धी पॅनलच्या प्रचार व प्रसाराच्या अनुषंगाने उमेदवार नसलेल्या नागपूर टीमने या सर्व उमेदवारंची वज्रमूठ बांधण्याच्या निस्वार्थ हेतूने स्नेहमिलन समारंभाचे आयोजन केले होते.
निस्वार्थपणे कोणतीही अपेक्षा न ठेवता, समृद्धी पॅनलचा उमेदवार नसताना सुद्धा स्वयंप्रेरणेने, नागपूर नगरीतील मतदारांच्या घरी जाऊन समृद्धी पॅनलला पोषक वातावरण निर्माण करणे आणि सभेला मतदार उपस्थित ठेवणे, हे कार्य खरंच कौतुकास्पद आहे आणि या सर्वांचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. असे मत सर्वसाधारण मतदार संघातील उमेदवार सचिन शंभरकर यांनी व्यक्त केले.
आयोजित स्नेहमिलन समारंभात अध्यक्ष लोमेश व-हाडे, अजय गावंडे, सचिन शंभरकर, पांडुरंग हुलके, मनोज माहुरे, प्रकाश बनसोड, धनंजय केचे, मोहन कुंभारे, दिलीप गावनेर, पंढरी तडस, अरूण झोटींग, गौतम पाटील, निलेश चव्हाण, वंदना कोल्हे व नेहा बुटे हे सर्व उमेदवार उपस्थित होते. सर्वांचे नागपूरकर टीमच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व उमेदवारांनी आपापले मनोगत व्यक्त करीत समृद्धी पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले.
या संमेलन आयोजनाची सर्वस्वी धुरा नागपूरकर टीम मधील विनोद साव, गोविंद अवगान, विलास मेश्राम, विशाल केदार, प्रेम भोजनकर, हेमंत पारधी, क्रिष्णा तिमासे, अमोल सोनकुसरे, पद्माकर भुरे आणि संपूर्ण नागपूरकर शिक्षक यांनी यशस्वीपणे पार पाडली. या संमेलनास नागपूर शहरातील महिला व पुरूष मतदार बहुसंख्येने उपस्थित होते. या स्नेहमिलन संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन हेमंत पारधी यांनी केले तर आभार विशाल केदार यांनी मानले.