
अनिल राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
नेहमी दुसऱ्यांच्या सुखासाठी जगणारा ,प्रत्येकाचे मन जाणणारा व राखणारा ,प्रत्येकाच्या मनात घर करणारा वैचारिक मित्र अनीलजी राठोड यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कास्ट्राईब शिक्षक संघटना पालघर जिल्हा सचिव, ठाणे पालघर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा ब्रेन,बंजारा कर्मचारी सेवा संघ कार्यालयीन सचिव महाराष्ट्र राज्य,पे बॅक टू सोसायटी तत्वानुसार समता मूलक ,संविधानातील
मुल्यानुसार समाजनिर्मिती व्हावी याकरिता आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत सुसज्ज संगणक कक्ष निर्माण करणारे.
समाजातील गोरगरीब विद्यार्थ्याना मदत करणारे ,आपल्या दोन्ही पुतणे यांना उच्च शिक्षित करून त्यांना आंबेडकरवादी कार्य करण्यास प्रोत्साहित करणारे , आडीवली अंबरनाथ ,तसेच नांदणी वाडा या शाळेचा सर्वांगीण प्रगती व्हावी याकरिता करोडो रुपयांचा निधी समाजाकडून उभारणारे आदर्श मुख्याध्यापक,बहुजन महापुरुष यांचे विचार कृतीत आणून समाजात रुजण्यासाठी कायम प्रेरणादायी व्याख्याने देणारे प्रभावी वक्ते,बंजारा समाजाला कर्मकांड,पुरोहित शाही,मनुवादी विचारापासून परावृत्त करून त्यांची प्रगती व्हावी या उद्देशाने संत सेवालाल महाराज,तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर ,राजर्षी शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले यांचे सत्य मानवतावादी विचार तळागाळात पोहचविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चळवळीचे जाळे व कार्यकर्त्यांची फौज तयार करणारे नेते, कास्ट्राईबच्या स्थापनेपासून ठाणे पालघर जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्ते,गाढे सर यांना पतपेढी संचालक बनवण्यासाठी तन मन धन देवून मनापासून मदत करणारे ,बहुआयामी ,तैल बुध्दी असलेले ,खेळकर मित्र अनिलजी राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील निरामय निरोगी आनंदी यशस्वी जीवनासाठी अनंत मंगल कामना.
विजयकुमार जाधव