
लाईट बंद करण्याचा अर्ज का दिला म्हणून चाकूने पोटात मारून केले जखमी
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद: वसंत नगर मध्ये राहणाऱ्याला राम रहीम नगर येथे राहणाऱ्या दोघांनी संगणमत करून दि.९ जून २०२३ रोजी च्या रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान वीज वितरण विभागाला लाईट बंद करण्यासाठी अर्ज का दिला या कारणावरून वाद निर्माण केला होता.त्यानंतर चाकू काढून पोटात मारून जखमी केले आहे.वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये दोघाजणांविरोधात विविध कलमान्वये दि.१० जून २०२३ रोजीच्या दुपारी १.४७ वाजता दाखल करण्यात आले आहे.
इमरान खान सरदार खान वय ३५ वर्षे रा.वसंत नगर गल्ली क्र.४ यांनी दिलेल्या तक्रारीवरून राम रहीम नगर येथे राहणाऱ्या शेख आसिफ शेख सत्तार वय ३० वर्षे व त्याच्या साथीदारां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वसंत नगर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेख आसिफने त्याच्या एका साथीदारासोबत संगणमत करून वीज वितरण विभागाच्या कार्यालयामध्ये लाईट बंद करण्यासाठी अर्ज का दिला या कारणावरून वाद निर्माण केला होता.त्यानंतर शिवीगाळ करीत चाकूने इमरानच्या पोटात मारून जखमी केले.सोबतच जीवाने ठार मारण्याची धमकी दिली आहे.प्रकरणाचा अधिक तपास वसंत नगर पोलिसांकडून केल्या जात आहे.