
‘जिजाऊ ब्रिगेड’तर्फे ऑनलाईन शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
सिलवासा: मराठा सेवा संघ प्रणित राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड तर्फे आज दि ११ जून २०२३ रोजी ऑनलाईन शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्ष शिवमती डॉ. निर्मलाताई पाटील मुख्य व्याख्याते म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष अमेरिका डॉ.संगीताताई दोडमल यांनी भूषविले.
अतिशय सुंदर अशा आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादरा नगर हवेली जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष सविता पाटील ठाकरे यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. संगीता ताई यांनी बदलत्या परिस्थितीत माणसाने स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी कालानुरूप काही परिवर्तनाची गरज अतिशय सुंदर रित्या विशद केली . छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विशद केला विशेषता गडकिल्ल्यांच्या संवर्धनाबाबत आणि अमेरिका व भारतातील लोकांच्या जीवनविषयक दृष्टिकोनामध्ये असलेल्या प्रचंड तफावत बाबत चिंता व्यक्त करून छत्रपतींचा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्यात निश्चितच काही परिवर्तनाची गरज आहे ती अपेक्षा व्यक्त केली.
मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पूर्व भारत श्री किशोर भोसले सर व त्यांच्या सौभाग्यवती सीमाताई भोसले यांच्या जिजाऊ पूजनाने कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला तर अंजलीताई पाटील यांनी सुंदर स्वरात जिजाऊ वंदना प्रस्तुत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुख्य व्याख्याता डाॕ.संगिताताई दोडमल यांचा परिचय दिल्ली जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्ष मनिषाताई राणे यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.निर्मलाताई पाटील यांनी याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडची आगामी काळातली वाटचाल व ध्येयधोरण निश्चित करताना सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार राष्ट्रीय सेक्रेटरी प्रदीप पाटील, वनिताताई काळे मयुराताई देशमुख इत्यादी मान्यवर व इतर पदाधिकारी व सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सविता पाटील ठाकरे यांनी मानले.