
आम्ही मराठी वाचक
आम्ही मराठी वाचक
सुज्ञ आणि जाणकार,
भविष्याचा वेध घेऊन
ज्ञानसंचय करू निरंतर.
देवाणघेवाण विचारांची
करू,भाषा समृद्धीसाठी,
मराठीची थोरवी वाढवू
तिच्या सक्षमीकरणासाठी
आदानप्रदान संस्कृतीची
देवू अन घेऊ,सातत्याने,
रीती अन परंपरेची गोडी
लावू मराठीच्या वाचनांनें,
करतील वाचक समीक्षा
मायमराठीच्या ज्ञानांची,
करू जागर,महानतेचा
कीर्तिवंत महती तिची.
ज्ञान स्पर्धेच्या युगात
साथ देते बुद्धीचातुर्य,
यशोशिखरी गेल्यावर
होईल साऱ्यांना आश्चर्य.
प्रबोधनकारी लेखन लिहून
वारसा चालवतील साहित्यिक,
मराठी समूहाचे शिलेदार आम्ही
शब्द विचारांची करू रुजवणूक.
मायादेवी गायकवाड
ता.मानवत, जि.परभणी
======