
रम्य सकाळी
रम्य सकाळी किरण सोनेरी
हलक्या हलक्या वाऱ्याच्या लहरी
फुले बोलू लागली डोले वृक्षवेली
जागी झाली लेकरे ही चिमुकली
पारिजातकाचा सुगंध दरवळला
मनामनाचा बंद दरवाजा उघडला
हवा हवा वाटे तो स्पर्श उन्हाचा
मनाला भुलवी मंजुळ आवाज कुणाचा
निसर्गाचा सुंदर देखावा मनात ठसला
क्षितिजावर लालज्वालेचा गोळा दिसला
मज भुळवी हा रम्य वसुंधरेचा देखावा
वाटे नजरेत जणू साठवून घ्यावा.
पर्यावरणाचा नका करू नाश
पृथ्वी सौंदर्याचा होईल विनाश
वृक्षवेली आम्हा सोयरे
मिळून त्यांचे संरक्षण करू सारे.
बेबीताई बोईनवाड/ नरवाडे
जिल्हा नांदेड
=====