किल्ले पन्हाळा..

किल्ले पन्हाळापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कोल्हापूरपासून उत्तरेला २० किमी अंतरावर असलेला पन्हाळा हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येतो. पर्यटकांचे आकर्षण असलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून ९७७ मीटर उंचीवर आहे. ११७८-१२०९ या काळात राजा भोज याने बांधकाम केले. नंतरच्या काळात हा किल्ला यादवांकडे सुपूर्द करण्यात आला. सोळाव्या शतकात हा किल्ला विजापूरने काबीज केला. आदिलशाहीने गडावर काही दरवाजे व चबुतरे बांधले. १६५९ ला शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. १७०१ मध्ये तो औरंगजेबाने घेतला. मुघल बादशहाने इंग्रज राज्यकर्त्यांकडे हा गड सुपूर्द केला. काही महिने पंत अमात्य रामचंद्र यांनी किल्ला ताब्यात घेतला. १७८२ मध्ये याचा कारभार कोल्हापूर मुख्यालयाकडे सोपवण्यात आला. १८४४ मध्ये स्थानिक राज्यकर्त्यांकडून ब्रिटीशांनी हा किल्ला घेतला. गडाच्या मुख्य ठिकाणापासून ७ किमीपेक्षा जास्त त्रिकोणी लांबीची गडाची लांबी वाढवण्यात आली. उतरण असलेल्या मोठ्या भिंती गडाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आल्या.
शिवछत्रपतींच्या इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला. सिद्दी जोहरने चार महिने किल्ल्याला वेढा दिला. एका पावसाळी रात्री या वेढ्यातून सुटून महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. सिद्दीच्या सैन्याचा पाठलाग बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत अडवून धरला व धारातिर्थी पडले. तेव्हा हीच खिंड पावनखिंड या नावाने ओळखली जाऊ लागली.
पन्हाळा येथे बस स्थानकापासून पुढील चौकात बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आहे. राणी ताराबाई यांनी जिथून राज्यकारभार पाहिला तो राजवाडा आहे. राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाकडे गडावरील सर्वात प्राचीन महालक्ष्मी मंदिर आहे. राजवाड्यासमोरील बाजूला सज्जा कोठी आहे. येथेच छत्रपतींनी संभाजी महाराजांना प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते. छत्रपतींची गुप्त खलबते करण्याचे हे ठिकाण. ज्या वाटेने शिवाजी महाराज वेढ्यातून निसटले तो राजदिंडी मार्ग आहे. अंबरखाना या ठिकाणी गंगा, यमुना, सरस्वती ही धान्यकोठारे आहेत. चारदरवाजा हा पूर्वेकडील महत्वाचा दरवाजा. या दरवाजाला लागूनच वीर शिवा काशिद पुतळा आहे. याशिवाय सोमाळे तलाव, सोमेश्वर मंदिर, रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी, संभाजी महाराज मंदिर, धर्मकोठी(दानधर्म करण्याची जागा), एकापाठोपाठ एक असणारे तीन दरवाजे, अंधार बावडी ही विहीर इत्यादी पाहता येते.
येथे बसने किंवा खाजगी वाहनाने जाता येते. १६ किमी अंतरावर कोल्हापूर येथे रेल्वेस्थानक आहे. ३६ किमी अंतरावर विमानतळ आहे.

स्वाती मराडे, इंदापूर जि पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles